मुंबई

Mumbai Rain : PWD मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मतदारसंघात रस्त्यांचे झाले ओढे !

दोन दिवसांपासून पावसाने शहरात दमदार हजेरी लावली आहे, परंतु आज सगळीकडेच पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. आज ‘मुसळधार’मुळे नेहमीप्रमाणे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली आहे. पावसामुळे पाणी साचणं, रस्त्यात खड्डे पडणं अशा समस्या नेहमीच उद्भवत असल्याने त्याची काळजी प्रत्येक आमदार खासदारांनी आपापल्या मतदारसंघात घेणे गरजेचे आहे परंतु परिस्थिती अगदी त्याच्या उलट पाहायला मिळते. दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या स्वतःच्या मतदार संघात सुद्धा हीच परिस्थिती आज उद्भवली. नांदिवली रोडवरील नाल्यापासून नांदिवली नाला ते टेकडी परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे तेथील रस्त्यांचे अक्षरशः ओढे झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

शहरातील रस्ते, इमारती यांचे चांगल्याप्रकारे काळजी घेणे हे तेथील महापालिकेप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुद्धा काम आहे परंतु राज्याच्या बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मतदार संघातच समस्यांनी डोकं वर काढल्याने चव्हाणांची  अब्रुच गेल्यासारखी झाली आहे. नांदिवली रोडवरील नाल्यापासून नांदिवली नाला ते टेकडी परिसरात सखल भाग आहे, येथे संततधार पाऊस कोसळत असल्याने समर्थ चौक, श्रीस्वामी समर्थ मठ परिसरात पाणी फार पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यातूनच लोकांना येजा करावी लागत आहे. पाण्यामुळे अंदाज येत नसल्यामुळे वाहतुक कोंडी येथे प्रचंड पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा…

Super Exclusive : उदय सामंतांनी नवाब मलिकांचा पणवती बंगला घेतला, अनिल देशमुखांच्या कार्यालयात पाऊल ठेवले; अन् न्यायालय कोपले !

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी वेदांता-फॉक्सकॉनच्या अपयशाचे श्रेय शिंदे सरकारच्या माथी मारले

Queen Elizabeth : जाणून घ्या ! राणी एलिझाबेथ यांच्या चिरतारुण्याचे रहस्य, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जाणार अंत्यविधीला

दरम्यान आमदार राजू पाटील यांनी मठाजवळ दोन मोठे पाणी उपसा पंप बसवले असल्याने तिथे फार पाणी साचलेले नाही, तरीही संपुर्ण रस्ताच जलमय झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरवर्षी पाणी साचल्यामुळे रस्त्याची पार चाळण झाल्याचे पाहायला मिळते, खड्ड्यांमुळे जागोजागी डबकी झाल्याचे दिसतात पण नेहमीच कसे हे चित्र वारंवार पाहायला मिळते असा सवाल नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

दरवेळी रस्त्याच्या कामांचे बजेट पास करून मंत्री आपापल्या मतदारसंघात प्रचंड पैसा घेऊन येतात, परंतु ज्यावेळी त्या कामाच्या अंमलबजावणीची वेळ येते तेव्हा मात्र संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार आपापसात मिलीभगत करून, पैसा लाटून अतिशय कमी दर्जाचे काम करतात आणि सर्वसामान्यांच्या डोळ्याला छान काम केलं अशी झापडं बांधतात. स्थानिक सुद्धा आपल्या गरजा पुर्ण केल्या म्हणून आनंदून जातात पण जेव्हा जेव्हा पावसाची मोठी सर येते तेव्हा या रस्त्यांची पुर्ण चाळण झाल्याचे पाहायला मिळते, मोठमोठे खड्डे पाहायला मिळतात, मेनहोलची सुदधा दुरावस्था होऊन जाते त्यामुळे अधिकारी खोटी बीलं काढून बोगस काम करत कंत्राटदारांसोबत हातमिळवणी करत असल्याचे सहजपणे दिसून येते

खरंतर सदर रस्त्याचे काम कोणी केले, रस्त्यांबाबत कोणी काळजी घ्यायला हवी, जर दरवर्षी पाणी साचत असेल तर त्यावर कोणी उपाययोजना करायला हवी याबाबतचा जाब महापालिकेला विचारायला हवा की आणखी कोणाला हे पाहणे महत्त्वाचे असले तरीही सरकारी अधिकारी आणि कंत्राटदार एकत्र आल्याचे सकृतदर्शनी लक्षात येत आहे. त्यामुळे आतातरी मंत्री रवींद्र चव्हाण आपल्या मतदारसंघात लक्ष देतील आणि तेथील समस्या सोडवतील का असा सवालच नागरिक करत आहेत.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

अजित पवार चंबळच्या खोऱ्यातून आलेत, बारामतीचा करणार बिहार !

अजित दादा, काय करून ठेवलंय तुम्ही हे. अहो, बारामतीचा अख्ख्या देशात नावलौकीक होता. विकास म्हणजे…

37 mins ago

नारळपाणी पिण्याचे फायदे

नारळपाणी म्हणजे उन्हाळ्यातील एक प्रकारचं अमृतचं पण नारळपाणी आपण फक्त उन्हळ्यातच नाहीतर बाकीच्या ऋतूंमध्ये देखील…

2 hours ago

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

18 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

18 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

19 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

19 hours ago