28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणAditya Thackeray : उद्धव ठाकरे रुग्णालयात होते, तेंव्हा मी स्कॉटलंडला होतो.... आदित्य...

Aditya Thackeray : उद्धव ठाकरे रुग्णालयात होते, तेंव्हा मी स्कॉटलंडला होतो…. आदित्य ठाकरे

माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची सद्या शिवसंवाद यात्रा सुरु आहे. ते रत्नाग‍िरी जिल्हयाच्या दौऱ्यावर आहेत.

माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची सद्या शिवसंवाद यात्रा सुरु आहे. ते रत्नाग‍िरी जिल्हयाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार न‍िशाणा साधला.‍ वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. त्याचे खापर त्यांनी शिंदे सरकारच्या माथी मारले. त्यांनी त्याविषयी स्पष्टीकरण दिले. वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प सोपा होता. या प्रकल्पाला 76 हजार कोटींची सबसीडी मिळणार होती. या प्रकल्पासाठी 1 लाख 50 हजार कोटींची गुंतणुक करण्यात येणार होती. सुमारे 1 लाख तरुणांना नोकऱ्या मिळणार होत्या. महाव‍िकास आघाडीची सत्ता असतांना आम्ही हा उदयोग महाराष्टात यावा यासाठी अनेक वेळा भेट घेतली होती.

आम्ही अनिल अग्रवाल यांच्या  संपर्कात होतो. जुन महिन्यांमध्ये देखील बैठक झाली होती. त्यामध्ये पुणे जिल्हयातील तळेगाव येथे हा प्रकल्प सुरू करण्याचे 100 टक्के ठरले होते. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जम‍िनीची पहाणी देखील केली होती. मात्र महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि त्यांनी या गोष्टीचा पाठ पुरवा केलाच नाही. 15 जुलैला एचपीसीची बैठक झाली होती. राज्यातील ही राजकीय स्थ‍िती लक्षात घेऊन त्यांनी हा प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय घेतला. गुंतवणुकदारांमध्ये भ्रम निर्माण करण्यात आला. वेदांता-फॉक्सकॉन ही कंपनी गाडयांसाठी लागणारे सेमी कंडक्टर बनवते. त्यामुळे हा एक नवीन उदयोग राज्या बाहेर गेला.या अपयशाचे श्रेय एकमेकांवर फोडले जात आहे. आशा प्रकारे
आदित्य ठाकरेंनी वेदांता-फॉक्सकॉनच्या अपयशाचे श्रेय शिंदे सरकारच्या माथी मारले.

हे सुद्धा वाचा

Queen Elizabeth : जाणून घ्या ! राणी एलिझाबेथ यांच्या चिरतारुण्याचे रहस्य, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जाणार अंत्यविधीला

Uday Samant : अनिल देशमुखांचे पणवती कार्यालय उदय सामंतांच्या नशिबी!

Eknath Shinde : शाळा – कॉलेजांत नशाबाजीचा नवा प्रकार, मुख्यमंत्र्यांकडे आली तक्रार!

एकनाथ शिंदे आण‍ि बंडखोर आमदारांनी माणुसकीशी गद्दारी केल्याचा आरोप यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला. उद्धव साहेबांचे ऑपरेश होते. त्यावेळी त्यांनी ही गद्दारी केली असे त्यांनी योवेळी सांगितले. उद्धव ठाकरेंची मणक्याची दोन ऑपरेशन झाली. त्यामुळे त्यांच्या मनावर दडपण होते. दुसरे ऑपरेश झाल्यावर हालचाल होत नव्हती. दरम्यानच्या काळात मी देखील स्कॉटलंडला होतो. राज्यात कोवीडचे रुग्ण वाढत होते. त्यावेळी त्यांनी ही संधी साधली.

मुख्यमंत्री 3 महिने कोणालच भेटू शकले नाही. मात्र व्हीडीओ कॉन्फरन्सवर बैठका होत होत्या. उद्धव ठाकरेंचे ऑपरेशन झाले, त्याचवेळी त्यांनी हा बंडखोरीचा विचार केला. वाईट काळ सुरू होता. त्यावेळी त्यांनी हा निर्लज्जपण केला‍ आणि गद्दारांनी पायउतार होण्याची वेळ आणली. ज‍िथे खोके दिसतात. त‍िथे त्यांचे ओके होतं. ते बेडका सारखी उडी मारुन तिथे गेले. आता देखील शिवसेना मोडायचा प्रयत्न सुरू आहे. कारण त्यांना राज्याचे 5 तुकडे करायचे आहेत. मला 32 वर्षांच्या तरुणाला तुम्ही सांभाळून घ्या. आशीर्वाद दया अशी भावनीक साद देखील त्यांनी यावेळी घातली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी