33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
HomeसंपादकीयQueen Elizabeth : जाणून घ्या ! राणी एलिझाबेथ यांच्या चिरतारुण्याचे ...

Queen Elizabeth : जाणून घ्या ! राणी एलिझाबेथ यांच्या चिरतारुण्याचे रहस्य, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जाणार अंत्यविधीला

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth) द्वितीय यांच्या अंत्यविधीला जाणार आहेत. परदेश मंत्रालयाच्या माहितीनुसार द्रौपदी मुर्मू या 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर असतील.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth) द्वितीय यांच्या अंत्यविधीला जाणार आहेत. परदेश मंत्रालयाच्या माहितीनुसार द्रौपदी मुर्मू या 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर असतील. 19‍ सप्टेंबरला राणीवर अंत्यसंस्कार होणार आहेत. राष्ट्रपती पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. राणीच्या अंत्यसंस्कारला जगभरातील 500 राष्ट्रप्रमुख आणि काही देशांचे पाहूणे हजेरी लावणार आहेत. वेस्टमिंस्टर एब्बेमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन, फ्राॅंसचे ‍राष्ट्रपती इमैनुएल मैक्रॉन देखील लंडनला पोहोचणार आहेत. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे 8 सप्टेंबरला निधन झाले. त्यांचे वय 96 वर्षे होते.

त्यांनी स्कॉटलँडमधील बाल्मोरल कॅसलमध्ये अंतिम श्वास घेतला. त्यांच्यावर शाही पद्धतीने अंत्यसंस्कार होणार आहेत. राणीच्या अंत्यसंस्कारासाठी भारताला आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र रशिया, बेलारुस, अफगाणिस्तान, म्यांनमार, सिरीया आणि व्हेनेजुएला या सहा देशांना याचे आमंत्रण दिले नाही. किंग चार्ल्स तिसरे यांना ब्रिटनच्या राजाचे अधिकार मिळाले आहेत. त्यांना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराणी एलिझाबेथ यांच्या शवपेटी जवळ शाही गार्ड तैनात करण्यात आले आहेत.

 राणीच्या चिरतारुण्याचे रहस्य

राणीच्या चिरतारुण्याचे रहस्य कोणालाच उलगडले नाही. त्यांनी त्या विषयी प्रसार माध्यमांना माहिती दिली नाही. मात्र त्यांची जिवनशैली खूपच सुंदर होती. सकाळची सुरूवात त्या अर्ल ग्रे चहाने करत होत्या. दुपारी आणि रात्री त्या शिजवलेला मांसाहार करायच्या. तसेच त्यांना केक सोबत चहा प्याला आवडायचे. ‍ नाष्टयामध्ये अनेक वेळा फिंगर सॅण्डवीच त्या खात होत्या. तसेच त्या दरोज मद्य प्रशासन करत होत्या. त्या रोज घोडेस्वारी करत होत्या.

हे सुद्धा वाचा:

Eknath Shinde : शाळा – कॉलेजांत नशाबाजीचा नवा प्रकार, मुख्यमंत्र्यांकडे आली तक्रार!

Jobs Updates : UPSC मार्फत 327 पदांची भरती

Smartphone Offers Update : अवघ्या 539 रूपयांत मिळणार स्मार्टफोन!

विशेष व्यायाम त्यांनी कधीच केला नाही. त्यांना रोज 11 वाजता झोपण्याची सवय होती. त्या पहाटे 7.30 वाजता उठून कामाला सुरूवात करायच्या. दिवसातील बराच वेळ त्या राजकारभारासाठी देत होत्या. त्यांनी कधीच धुम्रपान केले नाही. 2021 मध्ये त्यांना कोवीडची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना खूपच अशक्तपणा आला. थकवा जाणवत होता. विशेष म्हणजे 20 वर्षांत त्यांना केवळ 3 वेळाचा रुग्णलायात भरती करावे लागले होते. ऑक्टोबर 2021 मध्ये कोरोनाची लागड झाली. त्यावेळी उत्तर आर्यलंडचा दैरा त्यांना रद्द करावा लागला होता. त्यानंतर त्या राजवाडयातून  बाहेर पडल्या नाहीत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी