33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeएज्युकेशननरसी मोनजी व्यवस्थापन विद्यापीठाचे ‘सत्व’, अनिल कपूरसह अनेक कलाकारांची उपस्थिती

नरसी मोनजी व्यवस्थापन विद्यापीठाचे ‘सत्व’, अनिल कपूरसह अनेक कलाकारांची उपस्थिती

टीम लय भारी

मुंबई : उच्च शिक्षण संस्थांच्या वर्तुळात मानाचे स्थान असलेला ‘सत्व २०’ हा महोत्सव येत्या २२ जानेवारीपासून सुरू होत आहे. २४ जानेवारीपर्यंत हा महोत्सव रंगणार आहे. विलेपार्ले येथील नरसी मोनजी विद्यापीठाच्या ‘मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एण्ड इंजिनिअरींग’ या संस्थेच्या वतीने हा महोत्सव आयोजित केला आहे. ‘लय भारी डॉट इन’ हे या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक आहे.

‘सत्व’चे यंदा दहावे वर्ष आहे. यंदा ‘एन ओडीसी थ्रू टाईम’ या संकल्पनेवर हा महोत्सव आधारलेला आहे. या महोत्सवाअंतर्गत पहिल्या दिवशी बॉलिवूडमधील मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ होईल. रात्री खास कॉमेडी नाईट असणार आहे. दुसऱ्या दिवशी बॉलीवूडमधील मान्यवर संगित – गीतकारांचा दणकेबाज कार्यक्रम होईल. तिसऱ्या दिवशीही बॉलीवूडच्या उपस्थितीत रंगारंग कार्यक्रम असेल.

नरसी मोनजी व्यवस्थापन विद्यापीठाचे ‘सत्व’, अनिल कपूरसह अनेक कलाकारांची उपस्थिती

यंदाच्या ‘सत्व’साठी अनिल कपूर, दिशा पटनी, आदित्य रॉय कपूर, तन्मय भट्ट, नीती मोहन हे बॉलिवूड कलाकार आवर्जून उपस्थित राहणार आहेत. महोत्वसात संगीत, सांस्कृतिक, विविध कला व सामाजिक असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जवळपास ५००० विद्यार्थी व मान्यवर या महोत्सवात सहभागी होतील असे आयोजकांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरेंचा भन्नाट उपक्रम, जपानच्या सहकार्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविणार ‘ही’ योजना

आदित्य ठाकरेंच्या अभ्यासू मार्गदर्शनावर आयएएस अधिकारीही झाले चकीत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी