मुंबई

आता बेस्ट डेपोमध्येही आपली वाहने करा ई-रिचार्ज

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक पर्यावरणस्नेही बनविण्यासाठी बेस्ट’ (बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय) सुरु केलेल्या उपक्रमाअतंर्गत विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबवित आहे. प्रवाशांचा प्रवास गारेगार आणि सुखकर होण्यासाठी मार्च २०२४ पर्यंत ४,००० ई-बसेसची सेवा सुरु करण्यात येणार आहे. पण आता रिचार्ज करण्यासाठी ‘बेस्ट’ लवकरच ई-रिचार्ज स्टेशन्स सुरु निर्णय आहे. खासगी ई-वाहधारकांनाही ‘बेस्ट’च्या डेपोमध्ये आपल्या वाहनांचे रिचार्ज करता येणार आहे. मुंबईतील ५५ ठिकाणी ३३० ई-रिचार्ज स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. मार्च २०२३ पर्यंत यापैकी १० स्टेशन्सचे काम पूर्ण झालेले असेल. ‘बेस्ट’चे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी पायाभूत सुविधांची सद्यस्थिती नमुद करताना म्हंटले की, या महिन्याच्या अखेरपर्यंत यापैकी काही ई-रिचार्ज स्टेशन्स सुरु करण्यात येतील. काही ठिकाणांच्या व्यवहार्यतेबाबत चर्चा सुरु आहे. तर अन्य काही ठिकाणी विद्युत आणि मीटर जोडणीसंदर्भातील काम सुरु आहे. (Now e-recharge your vehicles even at Best Depot)

आमच्या बस गाड्यांचे ई- रिचार्ज करण्यासाठी बस सुविधा उभारण्यात येणार आहेत. भविष्यात लोकांनाही त्यांची ई-वाहने आणि मोटोरसायकलचे बस डेपोमध्ये रिचार्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येईल. खासगी शाळेच्या बसेसनाही या डेपोमध्ये ई-रिचार्ज करता येणार आहे. ज्यावेळी त्यांना त्यांची वाहने चार्ज करायची असतील त्यांना आधी त्यांच्या वेळेची नोंदणी करावी लागेल. आणि त्याप्रमाणे डेपोमध्ये आपली वाहने ई-रिचार्ज करता येणार आहेत, असे लोकेश चंद्र यांनी सांगितले.

यासाठी खासगी कंपन्यांसोबत करार करण्यात येणार आहे. ई-रिचार्जसाठी प्रत्येक युनिटमागे वाजवी दर आकारण्यात येणार आहेत. प्रत्येक युनिटसाठी किती किंमत आकारण्यात येईल, याबाबत खासगी कंपनी निर्णय घेणार आहे. तर यामधून जो महसूल जमा होणार आहे, त्याची विभागणी होईल, असे लोकेश चंद्रा यांनी सांगितले. ‘बेस्ट’ मुंबईतील जी ५५ ठिकाणे निवडली आहेत त्या ठिकाणी चार्ज करण्यासाठी तसेच एकाच वेळी कित्येक वाहने उभी करता येतील इतकी पुरेशी जागा असल्याचे ‘बेस्ट’ने सांगितले.

वाहने चार्ज कशी करता येतील
वाहनधारकांना आपली ई-वाहने चार्ज करण्यासाठी आधी ठिकाण आणि वेळेची नोंदणी करावी लागेल. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतरच त्यांना ठिकाण आणि निर्धारित वेळ मिळेल. खासगी वाहधारक डिजिटल पद्धतीचा वापर करून आपली आगाऊ वेळ नोंदवू शकतात.

या ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येतील.

हे सुद्धा वाचा

मुंबईची बेस्ट होणार आता १००% इलेक्ट्रिक: आदित्य ठाकरेंची घोषणा

महिंद्रा रॅली शानदार जानदार दमदार ऑफ रोड 4 बाय 4 ई-एसयूव्ही; हा कॉन्सेप्ट डिझाईन व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

न्यायपालिकाही भाजपच्या मगरमिठीत ; आपल्या मर्जीतल्या न्यायाधीशांना राज्यपाल पदाचे बक्षीस

टीम लय भारी

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

6 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

6 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

7 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

7 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

7 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

10 hours ago