31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबईनाशिक महापालिकेत तब्बल ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा

नाशिक महापालिकेत तब्बल ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या ‘एक्स’ या मायक्रोब्लॉगिंग साइटवरील पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारने नाशिक महापालिकेत तब्बल ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. येत्या दोन दिवसांत या घोटाळ्याचे पुरावे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या ‘एक्स’ या मायक्रोब्लॉगिंग साइटवरील पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारने नाशिक महापालिकेत तब्बल ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा  ( Land acquisition scam) केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. येत्या दोन दिवसांत या घोटाळ्याचे पुरावे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.(Rs 800 crore land acquisition scam in Nashik Municipal Corporation)

‘मोदी यांच्या काळात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार ठरत आहे. सध्याचे महाराष्ट्रातील मिंधे सरकार हे त्याचे ज्वलंत उदाहरण! नाशिक महापालिका हद्दीत ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा नगरविकास खात्याने केला असून, मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे लोक या गैरव्यवहारातील थेट लाभार्थी आहेत. मी दोन दिवसांत याबाबत गौप्यस्फोट करेन. तोपर्यंत लाभार्थींनी शांत झोपावे. महाराष्ट्र कोण लुटत आहे?’ असा आरोप संजय राऊत यांनी या पोस्टद्वारे केला आहे.संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘अभिनेता सलमान खान याच्या घरावरील गोळीबारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अनुज थापन याने पोलिस कोठडीत आत्महत्या केली. या प्रकरणात अनेक रहस्ये आहेत. पोलिस कोठडीत संशयित आरोपीचा मृत्यू झाला.या घटनेला महाराष्ट्राचे गृहमंत्रालय, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पोलिस आयुक्त जबाबदार आहेत. या आत्महत्येच्या तपासाची गरज आहे. केवळ मागणी करून काहीच होणार नाही. सरकार बदलले, तर अशा प्रकरणात तपास होईल. अन्यथा गृहमंत्री व पोलिस हे प्रकरण दाबतील, अशी शंकाही संजय राऊत यांनी व्यक्त केली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी