31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeक्राईमघोटी-सिन्नर महामार्गावरील मोटारसायकलींना अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू, ३ जखमी

घोटी-सिन्नर महामार्गावरील मोटारसायकलींना अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू, ३ जखमी

घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सिन्नरकडून येणारी मोटारसायकल क्रमांक (एमएच १५ एचएस ६८५२) व मोटरसायकल क्रमांक (एमएच १५ जीके ९३१४) या दोन मोटारसायकलींना घोटीकडून सिन्नरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला.

घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सिन्नरकडून येणारी मोटारसायकल क्रमांक (एमएच १५ एचएस ६८५२) व मोटरसायकल क्रमांक (एमएच १५ जीके ९३१४) या दोन मोटारसायकलींना घोटीकडून सिन्नरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक ( Hit by unidentified vehicle) दिल्याने हा अपघात झाला.(Motorcycles hit by unidentified vehicle on Ghoti-Sinnar highway; Two dead, three injured)

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली असून अपघात करणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाले आहे. तर या अपघातात प्रकाश उल्हास टिळे वय ३५ रा. शेणित सोमनाथ पांडुरंग सदगीर वय ३६ रा. पारदेव हे दोघे जागीच ठार झाले. तर गोकुळ किसन बिन्नर वय ३८ रा. पारदेवी सार्थक भास्कर जाधव वय १२ रा. शेणित हे दोन गंभीर जखमी झाले आहेत. तसेच ओमकार प्रकाश टिळे वय १३ रा. शेणित हा किरकोळ जखमी आहे.

दरम्यान, या अपघातातील सर्व जखमींना पुढील उपचारासाठी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी