31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्र...तरच मुंबईच्या नाईट लाईफचा विचार करु : अनिल देशमुख

…तरच मुंबईच्या नाईट लाईफचा विचार करु : अनिल देशमुख

लयभारी टीम

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी मुंबईमध्ये २४ तास हॉटेल्स, मॉल्स,पब्स सुरु ठेवण्याची संकल्पना मांडली होती. २६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरु करु असं सांगितलं होतं. परंतु गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाईट लाईफ बाबत मोठं विधान केलं. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक घेऊ त्यानंतर निर्णय घेऊ असं देशमुख यांनी सांगितलं. त्यामुळे सध्या तरी हा विषय बारगळण्याची शक्यता आहे.

मुंबईत नाईट लाईफ संकल्पना राबवल्यानंतर लागणारं पोलीस बळ या सर्वांचा विचार करावा लागेल. त्यासाठी नाईट लाईफचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवून त्यावर चर्चा करुन तो निर्णय घेतला जाईल. असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केलं. आदित्य ठाकरेंनी शुक्रवारी नाईट लाईफ बाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या त्यानंतर भाजपचे आमदार माजी मंत्री आशिष शेलार यांनी विरोध केला होता. नाईट लाईफमुळे रहिवाशी भागातील नागरिकांना हॉटेलांमुळे त्रास होईल त्याला आमचा विरोध आहे असं आशिष शेलार यांनी ट्विट केलं होतं.

युतीचं सरकार असताना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी मुंबईत नाईटलाईफ असावं ही संकल्पना मांडली होती. मात्र त्यावेळी याबाबत काही निर्णय झाला नाही. आता सत्तांतर झालं महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार अस्तित्वातं आलं. आदित्य ठाकरे हे स्वत: मंत्री झाले त्यामुळे त्यांच्या प्रस्तावाला महत्व प्राप्त झाल आहे. मात्र आता गृहमंत्र्यांच्या भूमिकेमुळे या प्रस्तावाला कितपत यश मिळतो. हे बुधवार ( २२ जानेवारी ) च्या बैठकीत नंतरच स्पष्ट होईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी