31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबईमंत्र्यांना आपल्या कार्यालयामध्ये नकोत महिला अधिकारी, महिला मंत्र्यांच्याही कार्यालयात पुरूष अधिकारी !

मंत्र्यांना आपल्या कार्यालयामध्ये नकोत महिला अधिकारी, महिला मंत्र्यांच्याही कार्यालयात पुरूष अधिकारी !

टीम लय भारी

मुंबई : ‘महाविकास आघाडी’च्या सरकारमध्ये एकूण ४२ मंत्री कार्यरत झाले आहेत. त्यात तीन महिला मंत्र्यांचा समावेश आहे. पण यातील एकाही मंत्र्याने आपल्या कार्यालयामध्ये महिला अधिकाऱ्यांना स्थान दिलेले नाही. ‘सामाजिक न्याया’चा अखंड धिंडोरा पिटणाऱ्या या सत्ताधारी पक्षाला महिला अधिकाऱ्यांची इतकी का भिती वाटते याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मंत्र्यांच्या कार्यालयात खासगी सचिव (पीएस), विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) व स्वीय सहायक (पीए) अशा पदांवर नियुक्त्या होत असतात. पण विद्यमान सरकारने या पदांवर केवळ पुरूष अधिकाऱ्यांच्याच नियुक्त्या केल्या आहेत. एकाही मंत्र्यांनी महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही. अंतराळ, लष्कर अशा आव्हानात्मक क्षेत्रातही महिला चमकदार कामगिरी करीत आहेत. मंत्री कार्यालयातही त्या आपली निश्चितच चमक दाखवू शकतील. मंत्रालयात उपसचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी या पदांवर अनेक महिला प्रभावी काम करीत आहेत. तहसिलदार, प्रांताधिकारी, उप जिल्हाधिकारी अशा पदांवर राहून पुरूषांना लाजवेल इतकी उत्कृष्ट कामगिरी महिला अधिकारी करीत आहेत.मंत्र्यांना आपल्या कार्यालयामध्ये नकोत महिला अधिकारी, महिला मंत्र्यांच्याही कार्यालयात पुरूष अधिकारी !

 

मंत्री कार्यालयात आपल्याला काम करण्याची संधी मिळावी म्हणून काही महिला अधिकाऱ्यांनी विविध मंत्र्यांची भेट घेतली. पण या मंत्र्यांनी केवळ महिला असल्याचे कारण देत अक्षरशः कानावर हात ठेवले. मंत्र्यांच्या या ‘अस्पृश्यते’च्या वागणुकीमुळे मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. अनौपचारिक चर्चांमध्ये या महिला अधिकारी आपला संताप व्यक्त करीत आहेत.

मंत्र्यांना आपल्या कार्यालयामध्ये नकोत महिला अधिकारी, महिला मंत्र्यांच्याही कार्यालयात पुरूष अधिकारी !
जाहिरात

विशेष म्हणजे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष तर सतत शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा सांगत असतात. महिलांच्या बाबतीत सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांचा वारसाही या सरकारचे नेते भाषणांमधून सांगत असतात. अनेक महिला नेत्या मंत्रीपदे मिळवताना महिलांनाही संधी मिळायला हवी यासाठी पोषक वातावरण तयार करतात. या वातावरणातूनच महिला पुढारी मंत्रीपदे पदरात पाडून घेतात. महिलांना संधी दिली पाहीजे या भावनेतूनच विद्यमान महिला मंत्री वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर व आदिती तटकरे यांना मंत्रीपदे दिली गेली आहेत. पण या तिन्ही मंत्र्यांनी मात्र आपल्या कार्यालयात एकाही महिला अधिकाऱ्याला संधी दिलेली नाही.

भाजप सरकारच्या काळात मंत्र्यांच्या कार्यालयात महिला अधिकारी होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात बाहेरील महिलांना संधी देण्यात आली होती. विनोद तावडे यांच्या कार्यालयातही एका शिक्षिकेला संधी दिली होती. पण विद्यमान मंत्र्यांच्या कार्यालयात महिला अधिकारी कुठेच दिसत नाहीत.

याबाबत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन उचलला नाही.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरेंच्या अभ्यासू मार्गदर्शनावर आयएएस अधिकारीही झाले चकीत

भाजपने धनगरांच्या देवस्थानांचीही केली फसवणूक, आता राष्ट्रवादीचे दत्ता भरणे पाळणार शब्द

महाराष्ट्र भाजपमधील तमाशा पोहचला दिल्लीदरबारी!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी