मुंबई

Mumbai Terror Attack : मुंबई 26/11 सारखी उडवून देण्याची धमकी, एकास अटक

मुंबई पोलिसांच्या वाहतुक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज मिळाला आणि एकच खळबळ उडाली. मुंबईत पुन्हा 26/11 प्रमाणे हल्ला (Mumbai Terror Attack) घडवून आणणार अशा आशयाचा मेसेज मिळाल्याने मुंबईत पोलिसांकडून सर्वत्र सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली असून विरार परिसरातून या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. या आधी कोकणातील हरिहरेश्वर येथे दोन बोटी संशयास्पदरीत्या सापडल्या होत्या त्यामुळे राज्यात सध्या तणावाचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे नेमकं राज्यात चाललंय तरी काय असा पेच सगळ्यांना पडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतुक नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने धमकीचे 26 मेसेज पाठवले. या मेसेजमध्ये 26/11 सारखा पुन्हा हल्ला मुंबईत करणार असल्याचे नमुद करण्यात आले होते. सदर धमकी ही एका पाकिस्तानी फोन नंबर वरून देण्यात आली आहे. दरम्यान या मेसेज प्रकरणी मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी करून याबाबत कसून चौकशी सुरू केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विरारमधून एका व्यक्तीस ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे.

हे सुद्धा वाचा…

भारताचा आणखी एक क्रिकेटपटू निवृत्ती घेणार

Reservation : ‘पब्जी’, ‘लुडो’ खेळणाऱ्यांही नोकरीत आरक्षण द्या

Shahaji Bapu Patil : एकदम ओके म्हणणाऱ्या शहाजी बापूंच्या मतदारसंघात काहीच ओके नाही

मुंबई पोलिसांना पाठवलेल्या संदेशात मेसेजकर्ता म्हणतो, जर तुम्ही माझे लोकेशन ट्रेस केले तर ते भारताबाहेर दिसेल, पण स्फोट मात्र मुंबईत होईल. भारतात 6 लोक हे काम पार पाडणार आहेत. या धमकीच्या मेसेजनंतर मुंबई पोलिसांनी शोधकार्य सुरू केले असून याबाबत इतर तपास यंत्रणांना सुद्धा कामाला लागल्या आहेत.

धमकीचा मेसेज मिळण्याआधी रायगड जिल्हातील हरिहरेश्वर येथे संशयित बोटी सापडल्या होत्या त्यानंतर मुंबई उडवण्याचे धमकीचे मेसेज आल्यामुळे राज्यात विशेषतः मुंबईला हाय अलर्ट देण्यात आला आहे. या घटनाक्रमांमुळे सामान्य माणसांमध्ये सुद्धा सध्या घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे खरंच पुन्हा मुंबईवर संकट घिरट्या घालू लागले आहे का असा सवालच सगळीकडून विचारण्यात येत आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

काश्मिर पटेलांना नको होते, पण पंडित नेहरूंनी भारतात आणले !

काश्‍मीर प्रश्‍नाचा जो काही गुंता झाला आहे त्याचं पितृत्व नेहरुंचच असं मानणारा मोठा वर्ग देशात…

12 mins ago

इंदिरा गांधी, पोलादी पंतप्रधान

‘इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया’ असे राष्ट्रीय कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याने इंदिरा गांधींच्या…

2 hours ago

अशोक कटारिया उपनगर पोलिसांसमोर ‘हजर’!

आयुक्तालयाने 'लूक आऊट' नोटीस बजावल्यानंतर ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया (Ashok Kataria) यांनी शुक्रवारी (…

2 hours ago

पत्रकार नेहा पुरव यांना धमकी देण्यार्‍यांना गजाआड करा; मुंबई मराठी पत्रकार संघाची मागणी

पत्रकार नेहा पुरव (journalist Neha Purv) प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना घरी जाऊन बातमी…

2 hours ago

नाशिक जेलरोड येथील महिलेला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पुण्यातून अटक

जेलरोड परिसरातील मोरे मळ्यात क्षुल्लक कारणावरून महिलेला घरात कोंडून बाहेरून आग लावली आणि महिलेस जिवंत…

3 hours ago

शंभर वर्षातील स्क्वाड्रन लीडर च्या कार्याचे कौतुक करण्यासाठी एअर मार्शल नाशिकमध्ये दाखल

प्रचंड जिद्दीची,चिकाटीची, अतुलनीय शौर्याची आणि प्रखर देशाभिमानाची।। होय,आज अभिमानाने सांगावेशे वाटत आहे. कहाणी रानवड च्या…

3 hours ago