31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeमुंबईउद्धव ठाकरेंचा दे धक्का : मनिषा म्हैसकर यांची दुय्यम पदावर बदली, महेश...

उद्धव ठाकरेंचा दे धक्का : मनिषा म्हैसकर यांची दुय्यम पदावर बदली, महेश पाठकांचे प्रमोशन

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल चा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर आज आणखी आठ जणांच्या बदल्या केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्रालयात स्वत:चे वजन तयार केलेल्या मनिषा म्हैसकर यांची अत्यंत दुय्यम पदावर बदली करण्यात आली आहे, तर दुय्यम पदावर कार्यरत असलेल्या महेश पाठक यांची बदली महत्वाच्या पदावर केली आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी

1. श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर प्रधान सचिव नगर विकास विभाग यांची नियुक्ती प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी

2. श्रीमती जयश्री भोज व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक यांची नियुक्ती अतिरिक्त महापालिका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई

3. श्री महेश पाठक प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा यांची नियुक्ती प्रधान सचिव नगर विकास-2 या पदावर

4. श्री डी एम मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी परभणी या पदावर

5. डॉ व्ही एन सूर्यवंशी यांची नियुक्ती महापालिका आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण या पदावर.

6.श्री सचिंद्र प्रताप सिंह अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे यांची नियुक्ती आयुक्त पशुसंवर्धन पुणे या पदावर

7. श्री सी. के. डांगे सचिव सामान्य प्रशासन विभाग यांची नियुक्ती महापालिका आयुक्त मिरा भाईंदर महानगरपालिका या पदावर

8. श्री एम देवेन्‍द्र सिंह महापालिका आयुक्त लातूर महानगरपालिका लातूर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी यवतमाळ या पदावर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी