29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमुंबईबाळासाहेब थोरातांच्या खासगी सचिवांना निरोप घेताना अश्रू झाले अनावर!

बाळासाहेब थोरातांच्या खासगी सचिवांना निरोप घेताना अश्रू झाले अनावर!

लय भारी टीम

मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करून उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चालणारे मविआ सरकार कोसळले. सरकार कोसळल्यानंतर मविआ सरकारमधील मंत्री आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी आपले ऑफिसमधील कामकाज गुंंडाळण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, काॅंग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांचे कार्यालय सोडताना त्यांचे पीएस रामदास खेडकर यांना कार्यालय सोडताना अश्रू अनावर झाले. मविआ सरकार अचानक कोसळल्याने अधिकारी वर्गसुद्धा भावनिक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

निखिल पापडेजा यांनी सोशल मिडीयावर हा भावनिक प्रसंग टिपून व्हिडिओसह पोस्ट केला आहे. ट्विटर पोस्टमध्ये निखिल लिहितात, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांचे PS रामदास खेडकर सर यांना कार्यालय सोडताना अश्रू अनावर झाले त्यांचा हा भावनिक क्षण असे म्हणून निखिल यांनी यात मविआच्या प्रमुख नेत्यांना टॅग केले आहे.

व्हिडिओमध्ये बाळासाहेब थोरात यांचे पीएस रामदास खेडकर यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसत असून त्यांना इतर लोक खांद्यावर हात ठेऊन सांत्वन करीत असल्याचे दिसत आहे. सरकार कोसळले तरीही अधिकारी आणि मंंत्र्यांमधील हे तयार झालेले भावनिक नात्यातील ओलावा, जिव्हाळा पुन्हा पुन्हा दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा :

जयंत पाटील यांनी राज्यपालांना ‘गोंजारत‘ चिमटे काढले!

उदय सामंत अजूनही उद्धव ठाकरेंबरोबरच!

गोपीचंद पडळकरांच्या मंत्रीपदासाठी कार्यकर्ते घालणार अभिषेक !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी