31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजभ्रष्टाचाराने बुडलेल्यांनी आरोपाचे धाडस करू नये, राऊतांचा राणेंवर पलटवार !

भ्रष्टाचाराने बुडलेल्यांनी आरोपाचे धाडस करू नये, राऊतांचा राणेंवर पलटवार !

टीम लय भारी

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत  यांच्यातील चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरून दावे आणि प्रतिदावे संपण्याचे नाव दिसत नाही. (narayan Rane  retaliated about corruption)

नारायण राणे यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत अतिशय कठोर शब्दात शिवसेनेवर हल्ला चढवला होता.

अजित पवारांचे निर्देश, कोरोना निर्बंध हटवले

Air India : १८ हजार कोटींचा व्यवहार, २७०० कोटी कॅश; पाहा Air India साठी टाटा-मोदी सरकारमध्ये अशी झाली डील

बाजारात जी चिल्लर दिसते आहे, त्यांना कधी पर्यटन म्हणजे काय हे तरी माहित होते का ? असा सवाल नारायण राणेंनी यावेळी विचारला होता. तसेच चिपी विमानतळाचे सगळे श्रेय हे भाजपचेच असल्याचाही दावा त्यांनी केला. पण दाव्यांना आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चोख शब्दा उत्तर दिले आहे.

चिपी विमानतळाचे उद्घाटन हे प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधीची जबाबदारी सांभाळणाऱ्या आमच्यासारख्यांना हा एक आनंदाचा दिवस आहे. आमच्या पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी जे काम केले ते प्रत्यक्षात अवतरण्याचा आजचा दिवस आहे. श्रमाचे फळ मिळाल्याचा आनंद आहे. १९९९ साली भूमीपूजन झाले, त्यानंतर २००३ साली पहिल भूमीपूजन झाले. भूमीपूजन करण्याचे काम दोन वेळा झाले.

पण खऱ्या अर्थाने विमानतळाच्या कामाला सुरूवात ही २०१६ साली झाली. स्वतः काचेच्या घरात राहणाऱ्याने जे भ्रष्टाचाराच्या चिखलात जे डुबलेले आहेत, त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करायचे धाडस करू नये. सिंधुदुर्गात महाविकास आघाडीने गेल्या दोन वर्षात ज्या पद्धतीने कामे केली आहेत, आम्ही केव्हाही पंचनामा करायची आमची तयारी आहे. खासदारकीची राज्यसभेत इतकी वर्षे काढलेली असताना विमानतळाच्या परवानगीसाठी इतका वेळ का गेला ? असाही सवाल विनायक राऊत यांनी केला आहे.

शेतकरी घरदार सोडून रस्त्यावर बसलाय मात्र कुणी ढुंकून पाहत नाही, शरद पवारांचा हल्लाबोल

भ्रष्टाचाराने बुडलेल्यांनी आरोपाचे धाडस करू नये, राऊतांचा राणेंवर पलटवार !

Maharashtra CM Uddhav Thackeray, Narayan Rane on one plane to inaugurate Chipi airport today

आजचा दिवस हा सिंधुदुर्ग आणि कोकणवासीयांसाठी आनंदाचा दिवस आहे. हा आनंद घेण्याची मोठी भावना मनात असायला हवी, पण दुर्दैवाने राणेंकडे ती नाहीए असेही विनायक राऊत म्हणाले. हे सिंधुदुर्गाचे दुर्दैव नाही, हे त्यांचे दुर्दैव असे. टीका करायची की आनंद घ्यायचे हे राणेंनी ठरवावे.

एमआयडीसीने शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससाठी विमानाची तिकीटे बुक केली आहेत, तशीच तिकिटे ही भाजपसाठीही बुक केली आहे. हे फ्लाईट पॅसेंजर फ्लाईट म्हणून आहे. मुख्यमंत्री हे शासकीय विमानाने चिपी एअऱपोर्टवर येणार आहेत, असेही राऊत म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी