राष्ट्रीय

आधारकार्ड सोशल मीडियावर शेअर करु नका; गैरवापर होत असल्याचा संशय असल्यास येथे करा संपर्क

एखाद्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आधारकार्डचा देशभरात वापर केला जातो. आधार हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ओळखपत्र म्हणून वापरात येते. ओळखपत्र म्हणून आधारकार्डचा वापर केला जावू शकतो मात्र आपण आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्डचा जसा सावधगिरीने वापर करतो तशाच पद्धतीने आधारकार्डचा देखील वापर करावा, असे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने म्हटले आहे. नागरिकांनी आपल्याला आलेले आधारचे पत्र / पीव्हीसी कार्ड किंवा त्याची प्रत कुठेही ठेवू नये, गहाळ करू नये असे आवाहन यूआयडीएआयने केले आहे. नागरिकांनी पब्लिक डोमेनमध्ये विशेषतः सोशल मीडिया (social media) आणि सर्वांसाठी पब्लिक प्लॅटफॉर्मवर शेअर करू नये, (Aadhaar card Do not share on social media) असा सल्लाही यूआयडीएआयने दिला आहे. तसेच आधारचा पिन देखील कोणाशी शेअर करु नये य़ुआय़डीएआयने म्हटले आहे.

जर का एखाद्या नागरिकाला आपल्या आधार कार्डाचा दस्तऐवज द्यायचा नसेल तर अशा परिस्थितीसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) व्हर्जुअल आयडेन्टिटीफायर अशी ऑनलाईन पद्धतीने ओळख पटवून देण्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे. प्रत्यक्ष आधार क्रमांक देण्याऐवजी पर्यायी पद्धतीने आपली ओळख पटवून देण्यासाठी संबंधीत व्यक्तीला अधिकृत संकेतस्थळाला किंवा माय आधार पोर्टलला (myaadhaar portal) भेट द्यावी लागेल.
यूआयडीएआयने आधारच्या सुरक्षेसाठी आधार लॉकिंग तसेच बायोमेट्रिक लॉकिंगची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. जर का एखादा नागरिक विशिष्ट काळात आधारचा वापर करणार नसतील तर अशावेळी ते आधार लॉकिंग तसेच बायोमेट्रिक लॉकिंगचा वापर करून आपल्या आधारची सुरक्षितता निश्चित करू शकतात, असे युआयडीएआयने म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्याकडून एक लाखांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यासह, लिपीक आणि वकिलाला अटक

पेलेच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली; म्हणाले त्यांची कारकीर्द भावी पिढ्यांना ते प्रेरणा देईल

ऋषभ पंतला पेंग आल्यामुळे झाला अपघात; दोनशे मीटर पर्यंत गाडीने घेतल्या पलट्या..

तुमच्या आधारचा गैरवापर होतोय अशी शंका आहे का?

जर आपल्याला आधारचा गैरवापर वापर होत असल्याचा संशय असेल, किंवा आधारशी संबंधित अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, तर अशा माहितीसाठी आधारक्रमांक धारक नागरिक 1947 या मोफत आधार मदत क्रमांकावर यूआयडीएआयशी संपर्क साधू शकतात. ही मदत क्रमांकाची सेवा 24×7 उपलब्ध आहे. याशिवाय असे नागरिक help@uidai.gov.in या ईमेलवरही ईमेल करू शकतात, असे य़ुआयडीएआयने म्हटले आहे.

प्रदीप माळी

Recent Posts

अजित पवार चंबळच्या खोऱ्यातून आलेत, बारामतीचा करणार बिहार !

अजित दादा, काय करून ठेवलंय तुम्ही हे. अहो, बारामतीचा अख्ख्या देशात नावलौकीक होता. विकास म्हणजे…

2 hours ago

नारळपाणी पिण्याचे फायदे

नारळपाणी म्हणजे उन्हाळ्यातील एक प्रकारचं अमृतचं पण नारळपाणी आपण फक्त उन्हळ्यातच नाहीतर बाकीच्या ऋतूंमध्ये देखील…

3 hours ago

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

19 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

20 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

20 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

20 hours ago