31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयगॅस दर घटणार; मोदी सरकार जनतेला महागाईपासून दिलासा देणार

गॅस दर घटणार; मोदी सरकार जनतेला महागाईपासून दिलासा देणार

महागाईचे चटके सोसणाऱ्या जनतेला अखेर मोदी सरकार आता दिलासा देण्याच्या तयारीत आहे. लवकरच देशातील सीएनजी आणि पीएनजी गॅसचे दर सरकार कमी करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत गॅस दरांसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पेट्रोलियम मंत्रालयाशी निगडीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाने नैसर्गिक गॅसच्या दर कमी करण्यासाठी सहमती दर्शविली आहे. त्यासाठी २०१४ च्या नियमावलीत मोठा बदल केला आहे. नव्या नियमावलीनुसार सीएनजी, पीएनजी गॅसच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पाईपलाईनव्दारे घरगुती पुरवठा करणाऱ्या धोरणात दुरुस्ती केली आहे. त्यामुळे आगामी काळात सीएनजी, पीएनजीचे दर कमी होणार आहेत. सर्गिक वायूची किंमत भारतीय क्रूड बास्केटच्या मासिक सरासरीच्या 10% असेल आणि दर महिन्याला अधिसूचित केली जाईल. 030 पर्यंत भारतातील प्रमुख ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा वाटा सध्याच्या 6.5% वरून 15% पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, घरगुती गॅसच्या किंमती आता इंपोर्टेड क्रूड ऑईल सोबत लिंक केल्या जाणार आहेत. ते म्हणाले, क्रुड ऑईलचा दर ८५ टक्के असल्यास त्याच्या १० टक्के साडे आठ टक्के गॅसचा दर असणार आहे. रविवार पासून ही दुरुस्ती लागू करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

सीएनजी आणि पीएनजी गॅस दरामध्ये कपात झाल्यास ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या धोरणानुसार देशभरात गॅसचे दर कमी होणार आहेत. साधारण सीएनजी ५ ते ८ आणि पीएनजी ५ ते ६ रुपये स्वस्त होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात पुण्यात सीएनजीचे दर ५ रुपये मुंबईत ८ रुपये दिल्लीत ६ रुपये बंगळुरुमध्ये ६ रुपये, मेरठमध्ये ८ रुपये प्रतिकिलो स्वस्त होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

शहरांची नावे बदलण्याचे राजकारण सावरकरांनी 63 वर्षांपूर्वीच सुरू केले

विदेशी पर्यटक जोडप्याने कथन केला मुंबईतील टॅक्सीवाल्यांचा वाईट अनुभव

अबब : राज्य सरकारच्या तिजोरीवर १००० कोटींचा दरोडा, नेत्यांच्या हावरटपणाचा कळस !  

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी