31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयठाण्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन

ठाण्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन

टीम लय भारी

ठाणे  : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा मुंब्रा मतदार संघात ‘महा रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा रोजगार मेळावा असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे (NCP organizes job fair in Thane).

या मेळाव्यात बँकिंग, मार्केटिंग, लॉजिस्टिक, टेलिकॉम, केपीओ / बीपीओ, डेटा एन्ट्री यासारख्या क्षेत्रात रोजगार भरती उपलब्ध आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी ८ वी ते पदवीधर पर्यंत असावी. तसेच वय वर्ष १८ ते ३५ पर्यंत वयोमर्यादा आहे. मुंब्रा येथील मुबारक बाग हॉल कौसा मुंब्रा पेट्रोल पंम्प येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Jitendra Awhad attacks on BJP : जितेंद्र आव्हाडांनी भाजपला झोडपले

जितेंद्र आव्हाडांनी सांगितली क्रांतिवीरांगणा हौसाक्का यांची एक आठवण

कळवा मुंब्रा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष शमीम खान, ठाणे मनपाचे विरोधी पक्षनेते शानु पठाण, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या साहाय्याने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Congress

भिवंडीत म्हाडा बांधणार 20,000 घरे : जितेंद्र आव्हाड

Why should central agencies trust Param Bir Singh who has fled country: Maha minister Jayant Patil

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत या मेळाव्याची माहिती दिली आहे. तसेच जास्तीत जास्त युवक युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा. अशा आशयाचा मजकूर आव्हाड यांनी लिहिला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी