30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजगोंयकारांसाठी राष्ट्रवादीचा खास असा गोवा विकास प्लॅन!

गोंयकारांसाठी राष्ट्रवादीचा खास असा गोवा विकास प्लॅन!

टीम लय भारी

गोवा : गोव्यात यंदा 13जागांवर राष्ट्रवादी निवडणूक लढवत आहे. कोणत्याही पक्षाला गोव्यात स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असे चित्र सध्या दिसत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोवेकरांचे प्रश्न सोडविण्यास मदत करेल, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले(NCP’s special Goa development plan for Goa residents!).

गोवा निवडणूक आता तोंडावर येऊन राहिली आहे. जसं जसे गोवा निवडणूक जवळ येत आहे तसतसे राजकीय पक्ष कामला लागले आहे.

आता या निडणुकीसाठी राष्ट्रवादीनेही गोव्यातल्या गोंयकारांसाठी विकासाचा प्लॅन आखला आहे. कारण बऱ्याच वर्षापासूनची तक्रार आहे की, गोव्यामधील तरुणांना रोजगार नाहीय, पर्यटनासंबंधी सुविधा व योजना नाहीयत, मग यावर तोडगा कसा काढता येईल यावर काही प्रश्न आहेत, तसेच गोव्याची संस्कृती जतन करण्याचीही गोवेकरांची मागणी आहे. यावर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यावर ही संस्कृती जपतानाच फॅमिली टुरिझमच्या माध्यमातून गोव्याचा कायापालट करु असे आश्वासन गोवा रहिवाशांना राष्ट्रवादी प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक देत आहे.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांचं कौतुक झाले, पण राष्ट्रवादीचा मोदींवर पलटवार

काँग्रेससोबतची चर्चा फसली, सेना-राष्ट्रवादी गोव्याची निवडणूक काँग्रेसशिवाय लढवणार

“मी फार छोटा माणूस…” असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर लगावला टोला

NCP eyes post-poll role in Goa if it improves tally of 1 notched up in 2017

शेतकऱ्यांबाबत बोलताना आताही गोव्यात 38 टक्के लोक शेती करत आहेत. मात्र त्यांना सिंचनाच्या सुविधा दिलेल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यास सिंचनाच्या व्यवस्था, ग्रीन हाऊसेसची सुविधा, फळबाग-फुलबागा फुलविण्यासाठी विविध अनुदाने देण्यात येतील. पशूसंवर्धन व पशूपालन व्यवसायासाठी मदत देखील केली जाईल. शिवाय शेतमजूर मिळवून देण्यासाठी मनरेगासारखी योजना गोव्यासाठी पुढे तयार करता येऊ शकतात का? यावरही राष्ट्रवादी काँग्रेस विचार करेल.

गोव्यात सर्वात मोठा व्यवसाय म्हणजे पर्यटन. गोव्यात कुटुंबआधारीत पर्यटन कसे वाढवता येईल, याचा प्रयत्न आम्ही करू. गोवा हे कसिनोप्रधान टुरिझम देखील आहे. आणि काही मध्यमवर्गीयांना गोव्याचे पर्यटन परवडत नाही. त्यासाठी फॅमिली संकल्पना सुरु करू. याबाबत पुढे जाऊन सखोल भागी विचार करून योजना राबवू असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. आणि या विकासाबाबत निर्णय सुरू असताना पर्यावरणाला कोणत्याच प्रकारचा धोखा बसणार नाही याची आम्ही काळजी सुद्धा घेऊ. अशी आपल्या पक्षाची एकतर्फी भूमिका नवाब मलिक यांनी मांडली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी