34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray : पायाखालचे दगड का निसटत आहेत याकडे लक्ष्य द्या :...

Uddhav Thackeray : पायाखालचे दगड का निसटत आहेत याकडे लक्ष्य द्या : उद्धव ठाकरे

टीम लय भारी

मुंबई : यशाची शिखरं पादाक्रांत करताना पायाखालचे दगड का निसटतायतं याकडे लक्ष्य द्या, असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने महाराष्ट्र भाजपामध्ये मोठा भूकंप झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या भाजपाला आत्मपरिक्षणाचा सल्ला दिला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, एकनाथ खडसे महाविकास आघाडीत येत आहेत त्यामुळे त्यांचं स्वागत आहे. त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलण्याची गरज नाही, कारण त्यांची स्वत:ची एक वेगळी ओळख आहे. ते स्पष्ट वक्ते आणि लढवय्ये आहेत. भाजपाची आणि आमची युती असताना सुरुवातीच्या काळापासून ज्यांनी भाजपाची पाळंमुळं महाराष्ट्रात रुजवली त्यात गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन होते त्यांच्यासोबत एकनाथ खडसे यांचा महत्वाचा वाट होता. खडसेंसारखा पाळंमुळं रुजवणारा माणूस ज्यावेळी पक्ष सोडतो तेव्हा मला असं वाटतं भाजपानं याचा गांभीयार्नं विचार केला पाहिजे. यशाची शिखरं पादाक्रांत करताना पायाखालचे दगड का निसटत आहेत याकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.’

‘पाया जर निसटला तर शिखरावरती पोहोचून उपयोग नाही. म्हणून शिखरावरती पोहोचताना पायाखालचे दगड का ठिसूळ होताहेत याचा भाजपानं विचार करायला हवा. भाजपापासून आम्ही बाजूला झालो, कालपरवा अकाली दल बाजूला झालं. आता पक्षातील त्यांचे कडवट-कट्टर कार्यकर्ते ज्यांनी स्वत:च्या आयुष्याची कुटुंबाची पर्वा न करता पक्षाची पाळंमुळं रुजवली ते सुद्धा जर सोडून जायला लागले तर याचा विचार त्यांनी करायला हवा. कधी काळी मी भाजपाचा मित्र होतो म्हणून हा मित्रत्वाचा सल्ला देतो आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी