फोटो गॅलरी

PHOTO: प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात या विदेशी अभिनेत्री, जाणून घ्या कोण…

बॉलीवूड त्याच्या आकर्षण, ग्लॅमर आणि स्टारडमसाठी जगभरात प्रसिद्ध आहे, जे अनेक परदेशी अभिनेत्रींना भारतीय चित्रपट उद्योगाकडे आकर्षित करते. भारतीय फिल्म इंडस्ट्रीने सुद्धा नेहमीच विदेशी अभिनेत्रींचे खुलेआम स्वागत केले आहे. बॉलीवूड चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. तर अशाच काही अभिनेत्रींबद्दल आज जानुन घेऊया……

कैटरीना कैफ

भारतीय चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री, कतरिना कैफ ही माजी मॉडेल आहे. तिने 2003 मध्ये बूम या हिंदी चित्रपटातुन बॉलीवूडमध्ये पदार्पण केले, परंतु नमस्ते लंडन द्वारे व्यावसायिक यशाची चव चाखली. कतरिना तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे परंतु मुख्यतः हिंदी चित्रपट उद्योगात ती लोकप्रिय झाली.

नर्गिस फाखरी

अमेरिकन फॅशन मॉडेल नर्गिस फाखरी हीने रॉकस्टार चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिची जोडी रणबीर कपूर सोबत दिसुन आली. नर्गिसचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झीला. तिचे वडील पाकिस्तानी तर आई झेक आहे, ती अमेरिकेच्या नेक्स्ट टॉप मॉडेल आणि 2009 मध्ये किंगफिशर स्विमसूट कॅलेंडरमध्ये सुद्धा दिसुन आली होती.

जॅकलिन फर्नांडिस

बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसणारी मॉडेल आणि ब्युटी क्वीन अभिनेत्री जॅकलिन ही मुळची श्रीलंकन आहे. ती मिस श्रीलंका युनिव्हर्स सुद्धा राहीली आहे. जॅकलिनने रितेश देशमुख सोबत अलादिन या काल्पनिक चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. जॅकलीन तिच्या हाऊसफुलमधील ‘धन्नो’ या आयटम साँगमधून प्रसिद्ध झाली, त्यानंतर महेश भट्टच्या थ्रिलर मर्डर 2 मध्ये ती इमरान हाश्मी सोबत दिसुन आली.

अली लार्टर

अली लार्टर किंवा अलिसन एलिझाबेथ ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे. तिने सलमान खान विरुद्ध मारीगोल्ड या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अलिसन एलिझाबेथ ही NBC मधील निकी सँडर्स आणि ट्रेसी स्ट्रॉस या तिच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत.

हे सुद्धा वाचा

Rishabh Pant Urvashi Rautela : पंत-उर्वशीच्या नात्याबाबत शुभमन गिलने केला मोठा खुलासा! म्हणाला,’त्याला फरक पडत नाही…’

Hemant Dhome: लोक चित्रपटाची तिकीटे काढले, मात्र शो कॅन्सल झाला; मराठमोळ्या दिग्दर्शकाची खंत

Shah Rukh Khan: किंग खान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये होणार सन्मानित

लिंडा आर्सेनियो

अमेरिकन अभिनेत्री लिंडा ही टेक्सासमधील एक मॉडेल आहे. जी तिच्या काबुल एक्सप्रेस (2006) या चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे. लिंडा तमिळ आणि तेलगू भाषेतील अनेक भारतीय चित्रपटांमध्ये दिसली आहे, तिने तेलगू चित्रपटात काही आयटम नंबर देखील केले आहेत.

सनी लिओनी

सनी लिओनी ही कॅनेडियन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. पूजा भट्ट दिग्दर्शित जिस्म 2 मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सनी बिग बॉस या टेलिव्हिजन शोसाठी भारतात आली आणि तिला अनेक बॉलिवूड चित्रपटाची ऑफर मिळाली.

अॅलिस पॅटन

अॅलिस पॅटन ही एक इंग्लिश अभिनेत्री आहे जी आमिर खान विरुद्ध रंग दे बसंती या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने स्यू ही व्यक्तिरेखा साकारली जी राजकारणी ख्रिस पॅटन यांची मुलगी आहे, आणि ब्रिटीश राजवटीबद्दल माहितीपट बनवण्यासाठी भारतात आली होती.

 

टीम लय भारी

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

14 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

15 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

15 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

15 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

16 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

17 hours ago