फोटो गॅलरी

PHOTO: महाविकास आघाडीच्या हल्लाबोल महामोर्चात उसळला जनसागर….

राज्यातील मंत्री, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh koshyari) यांनी महापुरूषांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे गेल्या महिनाभरात राज्यातील वातावरण तापले आहे. महाराष्ट्रातील महापुरूषांबाबत वारंवार होणारी आक्षेपार्ह वक्तव्ये, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवर आज महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चाला लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या मोर्चातील काही क्षणचित्रे.

या मोर्चाची सुरुवात भायखळा येथील रिचर्डसन कंपनीपासून झाली असून. बोरिबंदर येथील टाईम्स ऑफ इंडिया येथे या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.

या मोर्चात शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यासह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आदी पक्षदेखील सहभागी झाले होते.

महामोर्चात संजय राऊतांन सोबत महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांचा ही  समावेश.

महामोर्चात उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे यांचाही मोर्चात समावेश दिसुन आला .

महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महाराष्ट्र प्रेमी समुदायाने काढलेल्या विराट मोर्चाची काही निवडक क्षणचित्रं! पाहणाराचं vision विशाल असेल तर फोटोही तसेच दिसतील आणि vision ‘नॅनो’ असेल तर अतिविराट मोर्चाही ‘नॅनो’च दिसेल! – ‘रोहित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)

महाविकास आघाडीच्या मोर्चात सामील होण्यासाठी दत्ता परुळेकर बोरीवलीहून सायकलीवर आले आहेत , दत्ता 40 वर्षांपासून सायकलीवर फिरून शिवसेनेचं प्रचार करतात.

हे सुद्धा वाचा

महामोर्चात राज्यपाल रावणाच्या रूपात!

IPS अधिकाऱ्याची कौतुकास्पद कामगिरी, लेकीचा विवाह सोहळा बाजूला ठेवला, अन् बिकट प्रसंगात कर्तव्यावर हजर राहिला

…यांचा शेवट केल्याशिवाय गप्प बसायचे नाही; उद्धव ठाकरेंचा मुंबईत शंखनाद

महाविकास आघाडीच्या अनेक महिला नेत्यांंचाही या मोर्चात समावेश दिसुन आला.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य राज्यपाल आणि भाजप नेत्यांनी केले होते. त्याविरोधात महाविकास आघाडीच्यावतीने आज मुंबईत हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

Roshani Vartak

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

7 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

7 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

7 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

7 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

8 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

11 hours ago