33 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरमुंबईमहामोर्चात राज्यपाल रावणाच्या रूपात!

महामोर्चात राज्यपाल रावणाच्या रूपात!

महाविकास आघाडीच्या मोर्चात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी चक्क रावणाच्या रूपात दिसले! महाराष्ट्र कॉंग्रेसने सोशल मीडियावर महामोर्चाचे काही फोटो शेयर केले आहेत. त्यात एका दहा तोंडी रावणाच्या मुख्य मुखासाठी कोश्यारी यांचे छायाचित्र वापरलेले आहे. इतर मुखांसाठी भाजप नेत्यांची छायाचित्रे वापरली आहेत.

महाविकास आघाडीच्या मोर्चात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी चक्क रावणाच्या रूपात दिसले! (Governer Koshyari as Ravan) महाराष्ट्र कॉंग्रेसने सोशल मीडियावर महामोर्चाचे काही फोटो शेयर केले आहेत. त्यात एका दहा तोंडी रावणाच्या मुख्य मुखासाठी कोश्यारी यांचे छायाचित्र वापरलेले आहे. इतर मुखांसाठी भाजप नेत्यांची छायाचित्रे वापरली आहेत.

“महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजपरुपी रावणाचे दहन आता महाराष्ट्रातील जनताच करणार!” असे ट्विट महाराष्ट्र कॉँग्रेसने @INCMaharashtra या अधिकृत ट्विटर खात्यावरून केले आहे. त्यात दशमुखी रावणाच्या रूपात भाजप नेते व भाज्यपाल दाखविण्यात आलेले आहेत. महामोर्चात रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, राम कदम आदी भाजप नेत्यांसाह शिंदे गटाचे अब्दुल सत्तार व इतरांनाही रावणाच्या रूपात पेश केले गेले.

कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे, की महाविकास आघाडीच्या ऐतिहासिक महामोर्चाला पाहून महाराष्ट्राचे तुकडे करू पाहणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली असेल !

प्रा. वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे, “निवडणुकीवेळी महापुरुषांचे आशीर्वाद घेऊन मतांची ‘भीक’ मागणारे भारतीय जनता पक्षाचे नेते एवढे निर्ढावले आहेत की ते सतत महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करत आहे. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असा भाजपचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे.”

कॉँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी म्हटले आहे, ” महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा देण्याचं काम केलय. अन्य कोणत्याही राज्याच्या नावात ‘राष्ट्र’ हा शब्द नाही ; मात्र आपल्या राज्याच्या नावातच राष्ट्र आहे. याच महाराष्ट्राच्या पावन भूमित संत परंपरा उदयाला आली.”

हे सुद्धा वाचा : 

मविआ नेत्यांचा सुकाळ, कार्यकर्त्यांचा दुष्काळ!

रावणांनी मिळून श्रीरामांचा धनुष्यबाण गोठवला, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात

आता एकनाथ शिंदे गटातूनही राज्यपाल हटवाचा सूर

राष्ट्रवादीचे रविकांत वरपे यांनी म्हटले आहे, की
महाविकास आघाडीचा महामोर्चा
महाराष्ट्रद्रोही शिंदे-फडणवीस सरकार विरोधात हल्लाबोल !
महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी,
महापुरुषांच्या सन्मानासाठी..!

Governer Koshyari as Ravan, Mahavikas Aghadi MVA MahaMorcha, महामोर्चात राज्यपाल रावणाच्या रूपात!

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी