फोटो गॅलरी

सुखोई विमानातून सफर करणाऱ्या द्रौपदी मुर्मू दुसऱ्या महिला राष्ट्रपती

देशाच्या राष्ट्रपती आणि भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर द्रौपदी मुर्मू यांनी आज (8 एप्रिल) आसाममधील तेजपूर हवाई दलाच्या तळावरून सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून ऐतिहासिक हवाई सफर केली. अशा प्रकारची हवाई सफर करणाऱ्या राष्ट्रपती मुर्मू या तिसऱ्या राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.

हिमालयाच्या सफरी बरोबरच ब्रह्मपुत्रा आणि तेजपूर खोऱ्यात सुमारे 30 मिनिटे हवाई सफर केली. 106 स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन नवीन कुमार यांनी विमान उडविले. विमानाने समुद्रसपाटीपासून सुमारे दोन किलोमीटर उंचीवर आणि ताशी सुमारे 800 किलोमीटर वेगाने उड्डाण केले.


व्हिजिटर बुकमध्ये राष्ट्रपतींनी एक संक्षिप्त मनोगत लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या, त्या म्हणाल्या, “भारतीय वायुसेनेच्या बलाढ्य सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानात उड्डाण करणे, हा माझ्यासाठी आनंददायी अनुभव होता.

राष्ट्रपती मुर्मू यांनी पुढे असेही लिहीले की, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. भारताची संरक्षण क्षमता जमीन, हवाई आणि सागरी अशा सर्व सीमांना व्यापून टाकण्यासाठी प्रचंड विस्तारली आहे, याचा मला अभिमान आहे. मी भारतीय वायुसेना आणि तेजपूरच्या तळावरच्या हवाई दलाच्या संपूर्ण टीमचे या सफरीचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन करते.”

यावेळी राष्ट्रपतींना विमान आणि भारतीय वायुसेनेच्या क्षमतांबद्दलही माहिती देण्यात आली. राष्ट्रपतींनी भारतीय वायुसेनेच्याच्या क्षमतेवर समाधान व्यक्त केले. सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून राष्ट्रपतींची हवाई सफर घडवणे हा भारतीय सशस्त्र दलाच्या सर्वोच्च कमांडर या नात्याने सशस्त्र दलांशी संपर्क ठेवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

मार्च 2023 मध्ये, राष्ट्रपतींनी मुर्मू यांनी INS विक्रांतला भेट दिली होती आणि स्वदेशी बनावटीच्या विमानातील अधिकारी आणि खलाशांशी संवाद साधला होता.

प्रदीप माळी

Recent Posts

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

14 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

14 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

14 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

14 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

17 hours ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

17 hours ago