27 C
Mumbai
Monday, July 31, 2023
घरफोटो गॅलरीसुखोई विमानातून सफर करणाऱ्या द्रौपदी मुर्मू दुसऱ्या महिला राष्ट्रपती

सुखोई विमानातून सफर करणाऱ्या द्रौपदी मुर्मू दुसऱ्या महिला राष्ट्रपती

देशाच्या राष्ट्रपती आणि भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर द्रौपदी मुर्मू यांनी आज (8 एप्रिल) आसाममधील तेजपूर हवाई दलाच्या तळावरून सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून ऐतिहासिक हवाई सफर केली. अशा प्रकारची हवाई सफर करणाऱ्या राष्ट्रपती मुर्मू या तिसऱ्या राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.
President Draupadi Murmu traveled in a Sukhoi fighter plane
हिमालयाच्या सफरी बरोबरच ब्रह्मपुत्रा आणि तेजपूर खोऱ्यात सुमारे 30 मिनिटे हवाई सफर केली. 106 स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन नवीन कुमार यांनी विमान उडविले. विमानाने समुद्रसपाटीपासून सुमारे दोन किलोमीटर उंचीवर आणि ताशी सुमारे 800 किलोमीटर वेगाने उड्डाण केले.

President Draupadi Murmu traveled in a Sukhoi fighter plane
व्हिजिटर बुकमध्ये राष्ट्रपतींनी एक संक्षिप्त मनोगत लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या, त्या म्हणाल्या, “भारतीय वायुसेनेच्या बलाढ्य सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानात उड्डाण करणे, हा माझ्यासाठी आनंददायी अनुभव होता.

President Draupadi Murmu traveled in a Sukhoi fighter plane

राष्ट्रपती मुर्मू यांनी पुढे असेही लिहीले की, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. भारताची संरक्षण क्षमता जमीन, हवाई आणि सागरी अशा सर्व सीमांना व्यापून टाकण्यासाठी प्रचंड विस्तारली आहे, याचा मला अभिमान आहे. मी भारतीय वायुसेना आणि तेजपूरच्या तळावरच्या हवाई दलाच्या संपूर्ण टीमचे या सफरीचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन करते.”

President Draupadi Murmu traveled in a Sukhoi fighter plane

यावेळी राष्ट्रपतींना विमान आणि भारतीय वायुसेनेच्या क्षमतांबद्दलही माहिती देण्यात आली. राष्ट्रपतींनी भारतीय वायुसेनेच्याच्या क्षमतेवर समाधान व्यक्त केले. सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून राष्ट्रपतींची हवाई सफर घडवणे हा भारतीय सशस्त्र दलाच्या सर्वोच्च कमांडर या नात्याने सशस्त्र दलांशी संपर्क ठेवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

President Draupadi Murmu traveled in a Sukhoi fighter plane

मार्च 2023 मध्ये, राष्ट्रपतींनी मुर्मू यांनी INS विक्रांतला भेट दिली होती आणि स्वदेशी बनावटीच्या विमानातील अधिकारी आणि खलाशांशी संवाद साधला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी