राजकीय

नाना पटोले यांनीच महाविकास आघाडी सरकार पाडले : आशिष देशमुख

काँग्रेसमधून निलंबित होताच आशिष देशमुख यांनी बॉम्ब टाकला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच महाविकास आघाडी सरकार पाडले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्याबाबत वक्तव्य केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीने चौकशी केल्यावर आशीष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले.

या कारवाईनंतरआशीष देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल केला “नाना पटोलेंनी न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. म्हणून नाना पटोलेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यायला पाहिजे होती,असे देशमुख यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा 
रमजान महिन्यात मुंबईतील मुस्लीम वस्तीत दुषित पाणीपूरवठा

शिंदे सेनेचे कार्यकर्ते विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना

रॅपर उमेश खाडेची सुटका करा; जितेंद्र आव्हाड यांची मागणी

ते म्हणाले, मी सातत्याने काँग्रेस पक्षाच्या हिताचीच भूमिका घेतली आहे. ओबीसी समाज, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या हिताची गोष्ट कोण करत असेल, तर त्याला नोटीस देणे चुकीचे आहे. बजावण्यात आलेल्या नोटीसीला वेळेपूर्वीच शिस्तपालन समितीला उत्तर पाठवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Team Lay Bhari

Recent Posts

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

25 mins ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

1 hour ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

15 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

17 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

17 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

18 hours ago