34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रPoliceAction : धार्मिक तेढ निर्माण करणारा मेसेज पाठविणाऱ्या औरंगाबादच्या डॉक्टरला अटक

PoliceAction : धार्मिक तेढ निर्माण करणारा मेसेज पाठविणाऱ्या औरंगाबादच्या डॉक्टरला अटक

टीम लय भारी

औरंगाबाद : मुस्लीम धर्मगुरू मौलाना साद यांचा उल्लेख ‘अतिरेकी’ असा करून तो संदेश वॉट्सअपवर व्हायरल करणे एका डॉक्टरला चांगलेच भोवले आहे. या डॉक्टरवर औरंगाबाद पोलिसांनी ( PoliceAction ) गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

धार्मिक तेढ निर्माण करणारा संदेश पाठविल्याप्रकरणी रविवारी जामखेड पोलिसांनी ( PoliceAction ) एका समाजकंटकाला अटक केली होती. त्यानंतर आता औरंगाबाद येथे दुसरी कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबादच्या घटनेमधील व्यक्तीचे नाव संभाजी गोविंद चितळे ( वय ३८ ) असे आहे. तो सुप्रिसद्ध डॉक्टर आहे. त्याने वॉटस्अपवर मुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांचा फोटो टाकला होता. या फोटोसोबत इंग्रजीत एक संदेश पोस्ट केला होता.

‘वॉण्टेड : या अतिरेक्याच्या ठावठिकाणाची आपणांस काही माहिती असेल तर कृपया नजिकच्या पोलीस ठाण्याला माहिती द्या’ ( Wanted Plz inform your local police station if you had any input about location of this terriost ) असा वादग्रस्त संदेश संभाजी गोविंद चितळे याने पोस्ट केला होता.

PoliceAction : धार्मिक तेढ निर्माण करणारा मेसेज पाठविणाऱ्या औरंगाबादच्या डॉक्टरला अटक

वास्तवात, मौलाना साद हे मुस्लिम धर्मगुरू आहेत. पण त्यांचा अतिरेकी कारवायांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे साद यांच्या विषयी खोटी माहिती पसरविल्याने संभाजी चितळे याच्या मुसक्या औरंगाबाद पोलिसांनी  ( PoliceAction ) आवळल्या.

संभाजी चितळे याच्या या खोट्या संदेशाने दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी चितळे याच्या विरोधात ( PoliceAction ) कारवाई केली आहे.

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करू : गृहमंत्री

दिशाभूल करणारे जुने फोटो व व्हिडीओंचा गैरवापर करून दिल्लीतील निजामुद्दीनमधील घटनेशी संबंध जोडला जात आहे. वॉट्स अप व इतर सोशल मीडियावर असे फोटो व व्हिडीओ पसरवून धार्मिक दुही व तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून दिला आहे.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

MARKAJ : मुस्लिमांचं काय करायचं ? ( संजय आवटे )

PoliceAction : सोशल मीडियात मुस्लिमांबद्दल विद्वेष पसरविणाऱ्या अंध भक्ताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Covid19 : ‘टाळ्या वाजवणे, दिवे लावायला सांगणे हे पंतप्रधानांचे काम आहे का ?’

कोरोनाविषयी केंद्र सरकारने प्रसारित केलेली माहिती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी