31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रPolitics In BJP : राम शिंदेंचा पंकजाताई, चंद्रकांतदादांवर निशाणा

Politics In BJP : राम शिंदेंचा पंकजाताई, चंद्रकांतदादांवर निशाणा

टीम लय भारी

अहमदनगर : विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली नसल्याने भाजपमधील ( Politics In BJP ) ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांचे खासंमखास असलेले राम शिंदे यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

आपली नाराजी व्यक्त करताना त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व पंकजाताई मुंडे यांना ‘लक्ष्य’ केले ( Politics In BJP ) आहे. दादा व ताईंना लक्ष्य करणारा संदेश त्यांनी ट्विटरवर व फेसबुकवर प्रसिद्ध केला आहे.

Coronavirus

विधानपरिषदेच्या चार जागांसाठी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी मिळेल असा अंदाज होता. परंतु आयत्या वेळी नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावरून अनेक ज्येष्ठ नेते नाराज ( Politics In BJP ) आहेत. एकनाथ खडसे तर दररोज तोफगोळे डागत आहेत.

अशातच आता माजी मंत्री राम शिंदे यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. पंकजा मुंडे यांचे समर्थक रमेश कराड यांना उमेदवारी मिळाल्याने राम शिंदे यांनी नाराजी ( Politics In BJP ) व्यक्त केली आहे. अजित गोपछडे यांच्या ऐवजी रमेश कराड यांची उमेदवारी अधिकृत करण्यात आली आहे.

त्या पार्श्वभूमीवर ‘विधानपरिषदेसाठी इच्छूक नेते, उमेदवार समजून घेतील आणि शिकतील’ असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. हा संदर्भ देवून राम शिंदे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

दोन दिवसांत पंकजा मुंडे यांनी चांगला अभ्यास केला. त्यामुळे रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली. मला व इतरांना हा अभ्यास जमला नाही असा सूचक संदेश शिंदे यांनी सोशल मीडियातून दिला आहे.

राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमधील आहेत. पण फडणवीस यांनी आता गोपीचंद पडळकर यांना अधिक जवळ केले आहे, तर राम शिंदे यांना दूर सारल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे यांनी व्यक्त केलेली ही नाराजी फडणवीस यांनाही ( Politics In BJP ) लागू पडते असे बोलले जात आहे.

पुनवर्सन झाले नाही, तर राम शिंदे यांचे राजकारण अडचणीत

भाजपची फारसी ताकद नसताना राम शिंदे जामखेड – कर्जत मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आले आहेत. दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना भाजपने मंत्रीपद दिले होते. सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या राम शिंदे यांनी नगर जिल्ह्यात भाजप रुजविण्याचे मोठे काम केले.

दहा वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचेच वर्चस्व होते. त्या काळात राम शिंदे यांनी भाजप रुजविली. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी शिंदे यांच्या मतदारसंघात घुसखोरी केली. त्यातच विखे – पाटील यांच्याकडूनही दगा फटका झाला. त्यामुळे शिंदे यांना पराभव पत्करावा लागला.

रोहित पवार यांच्यासारख्या मातब्बर नेत्यासोबत झुंज देण्यासाठी राम शिंदे यांना मोठी ताकद आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचे विधानपरिषदेवर पुनवर्सन व्हायला हवे. तरच शिंदे पुन्हा कर्जत – जामखेडमध्ये घट्ट पाय रोवू शकतात. पुनर्वसन झाले नाही, तर शिंदे यांचे राजकीय ( Politics In BJP ) भवितव्य अडचणीत येऊ शकेल असे बोलले जात आहे.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

BJP Politics- एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली!

KhadseVsFadanvis : गोपीचंद पडळकरांची उमेदवारी, अन् एकनाथ खडसेंचा तिळपापड

Eknath Khadse Welcome In Party If He Accepts Our Ideology: Congress

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी