27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
HomeसंपादकीयKhadseVsFadanvis : गोपीचंद पडळकरांची उमेदवारी, अन् एकनाथ खडसेंचा तिळपापड

KhadseVsFadanvis : गोपीचंद पडळकरांची उमेदवारी, अन् एकनाथ खडसेंचा तिळपापड

तुषार खरात

भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी चार उमेदवार जाहीर केले, अन् राजकीय जानकरांच्या भुवया उंचावल्या. कारण ( KhadseVsFadanvis ) या चार जागांसाठी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे व चंद्रशेखर बावनकुळे यांना दिग्गज नेत्यांना उमेदवारी दिली जाईल हे जवळपास निश्चित होते.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही या चार जणांना तसा ‘शब्द’ दिला होता. पण गेल्या आठवड्यात अनपेक्षितपणे वेगळ्याच उमेदवारांची यादी जाहीर झाली, अन् भाजपमधील ‘निष्ठावंतां’चा संताप अनावर झाला. रणजितसिंह मोहिते – पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड या चार जणांना भाजपने उमेदवारी दिली.

या चारही जणांचे भाजपच्या वाटचालीत योगदान काय असा सवाल करण्यात आला. विशेषतः भाजपचे ज्येष्ठ व दुर्लक्षित नेते एकनाथ खडसे ( KhadseVsFadanvis ) यांनी उघडपणे तोफ डागून हा सवाल विचारला आहे. या चार जणांवर निशाणा साधताना त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर शेलके वार केले आहेत.

गोपीचंद पडळकर हे नरेंद्र मोदी यांना चले जाव म्हणाले होते. पडळकर यांनी धनगर समाजाला बिरोबाची शपथ देऊन भाजपला मतदान करू नका, असे आवाहन केले होते. असे असताना पडळकर यांना भाजपने उमेदवारी दिलीच कशी असा आक्षेप खडसे यांनी नोंदविला आहे.

खडसे यांच्यावर ( KhadseVsFadanvis ) भाजपने अन्याय केला आहे, याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. खडसे यांनी स्वतःला भाजपमध्ये ४२ वर्षे झिजवून घेतले आहे. विरोधी पक्षनेते असताना सभागृहात त्यांची कामगिरी उत्तमच होती.

सन २०१४ मध्ये राज्यात भाजपला सत्ता मिळाली. त्यावेळी खडसे यांना महसूल व कृषी मंत्रीपद दिले होते. तिथूनच खडसे – फडणवीस यांच्यातील सत्तासंघर्षाची सुरूवात झाली. मुळात मुख्यमंत्रीपदाचे खरे दावेदार होते, गोपीनाथ मुंडे. परंतु या निवडणुकीच्या काही महिने अगोदर मुंडे यांचे अपघाती निधन झाले.

KhadseVsFadanvis
खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे, महेता यांच्यावर भाजपमध्ये अन्याय झाला आहे

सन २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारकाळातच देवेंद्र फडणवीस यांची नरेंद्र मोदी यांच्यासोबत सलगी वाढली होती. विधानसभा निवडणुकीत तर हे संबंध आणखी दृढ झाले. योगायोगाने फडणवीस हेच त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे मोदी यांच्यासोबत त्यांचा थेट संबंध आला. मोदी यांना त्यावेळी नितीन गडकरी नकोच होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेडक्वार्टर असलेल्या नागपूरमध्ये गडकरींपेक्षा फडणवीसच बरे असे मोदी यांना वाटले असावे. म्हणून त्यांनी महाराष्ट्राची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपविली. त्यामुळे तेव्हा फडणवीस यांना अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली होती.

एकनाथ खडसे यांना दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले. पण खडसे ( KhadseVsFadanvis ) यांना ते बिल्कूल रूचले नव्हते. त्यामुळे तेव्हापासूनच खडसे यांनी फडणवीस यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करायला सुरूवात केली.

खडसे यांची नाराजी कधी कधी इतक्या टोकाची असायची की, फडणवीस ( KhadseVsFadanvis ) हे मुख्यमंत्रीपदावर आहेत हे सुद्धा ते विसरून जायचे. पक्षातील दुय्यम दर्जाची व्यक्ती अशाच पद्धतीने खडसे ( KhadseVsFadanvis ) हे फडणवीस यांना वागणूक द्यायचे. अगदी मंत्रीमंडळाच्या बैठकीतही खडसे ( KhadseVsFadanvis ) हे फडणवीसांना अरे – तुरे बोलायचे. अर्थात ज्युनियर आहे, म्हणून सिनियर्सची वाट्टेल ती दादागिरी कुणीही खपवून घेणार नाही.

फडणवीसांनाही तेच केले. त्यासाठी खडसे यांचा कारभारही कारणीभूत ठरला. खडसे यांचा कारभार स्वच्छ होता, असे आजही कोणीच छाचीठोकपणे सांगू शकणार नाही. खडसे यांच्यापेक्षा त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कारभाराच्या खुमासदार चर्चा अधिकारी वर्तुळात नेहमी चर्चिल्या जातात.

पुण्यातील भूखंड घोटाळा, दाऊदशी कथित संवाद आणि त्यांच्या एका अधिकाऱ्याचे आर्थिक प्रकरण अशा दोन – तीन प्रकरणांचे निमित्त ठरले, अन् त्यावेळी फडणवीस ( KhadseVsFadanvis ) यांनी खडसेंचा राजीनामा घेतला. राज्याच्या सत्तेत जेमतेम वर्षभरच खडसे यांना मंत्रीपदाची खूर्ची मिळाली. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला जी ओहोटी लागली ती आजतागायत थांबलेली नाही.

वादग्रस्त प्रकरणांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा मंत्रीमंडळात स्थान दिले जाईल, असा शब्द भाजप नेत्यांनी ( KhadseVsFadanvis ) खडसेंना दिला होता. परंतु हा शब्द शेवटपर्यंत कधी पाळला गेला नाही. सभागृहातील ज्येष्ठ नेते असूनही खडसे यांना मागच्या बाकावर बसायची वेळ आली.

गेली पाच वर्षे खडसे यांनी आपल्या मनातील खदखद सतत व्यक्त केली. पक्षाच्या बैठका, दिल्लीतील वरिष्ठ यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. वैतागून प्रसारमाध्यमांकडेही संताप व्यक्त केला. पण त्यांना पुन्हा पक्षाच्या मुख्य प्रवाहात संधी मिळाली नाहीच.

Coronavirus

कळस झाला तो विधानसभा निवडणुकीत. त्यांना पक्षाने तिकीटही दिले नाही. त्याऐवजी मुलीला उमेदवारी दिली होती. खडसे यांच्याबरोबरच विनोद तावडे, प्रकाश महेता व चंद्रशेखर बावनकुळे यांचेही तिकीट कापले होते. पंकजा मुंडे यांचा विधानसभेत पराभव झाला.

या पाच नेत्यांवर भाजपने अन्याय केल्याचे बोलले जात आहे. अन् त्यात बऱ्याच अंशी तथ्य सुद्धा आहे. पक्षाअंतर्गत स्पर्धक म्हणून या पाच जणांविरोधात फडणवीस ( KhadseVsFadanvis ) यांनी षड्यंत्रे रचली. हे पाच जण पक्षशिस्त पाळत नाहीत. त्यांच्या कारभारामध्ये आक्षेप आहेत अशीही कारणे त्यासाठी देण्यात आली.

एकूणच, बदललेल्या भाजपची महाराष्ट्रातील धुरा फडणवीस यांच्या खांद्यावर आहे. आपल्याला डोईजड ठरेल त्याला दूर करणे अशी फडणवीस यांची कार्यपद्धत आहे, अन् त्यांना दिल्लीतून त्यासाठी आशीर्वाद सुद्धा आहे. गेल्या पाच वर्षात तरी हेच चित्र दिसले आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही हेच चित्र कायम

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला सोबत घेऊन फडणवीस यांना सरकार बनविता आले नाही. अजित पवार यांच्या मदतीने औट घटकेचे सरकार फडणवीस यांनी बनविले, पण नामुष्कीरित्या त्यांना पायउतार व्हावे लागले. खडसे, तावडे, महेता, बावनकुळे यांची तिकीटे कापली नसती तर आणखी १० – १५ जागा वाढल्या असत्या असा निष्कर्ष सहा महिन्यांपूर्वी मांडला गेला होता.

एकनाथ खडसे व पंकजा मुंडे या दोघांनीही त्यावेळी देवेंद्र फडणवीस ( KhadseVsFadanvis ) यांचे नाव न घेता जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या दोघांची समजूत काढली होती. पक्षातील नेत्यांचे पंख कापल्याने आपलेच नुकसान झाल्याची चूक फडणवीस यांच्या लक्षात आली आहे, असेही त्यावेळी म्हटले गेले.

पण विधानपरिषदेच्या चार जागांवर या प्रमुख नेत्यांना तिकीट दिले नाही, त्यामुळे फडणवीस ( KhadseVsFadanvis ) यांनी आपले मागचे पाढे पंचावन्न हेच धोरण कायम ठेवल्याचे दिसत आहे. खडसे, मुंडे, तावडे व बावनकुळे यांचे पुनर्वसन करण्याची फडणवीस यांची इच्छा नाही असेच दिसत आहे.

गोपीचंद पडळकरांचे काय चुकले ?

भाजपमध्ये पक्षाअंतर्गत देवेंद्र फडणवीस यांचा खडसे व इतरांशी वाद आहे. त्याची कारणे वर नमूद केली आहे. या सुप्त संघर्षातूनच फडणवीस यांनी खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे यांची तिकीटे कापली आहेत. हे खडसे यांनाही चांगलेच ठाऊक आहे. पण असे असताना खडसे यांनी पडळकर, मोहिते – पाटील, दटके, कराड यांच्यावर तोफ डागली आहे.

पडळकर, मोहिते – पाटील, कराड हे नेते पक्षात जरी अलिकडे आले असले तरी त्यांनी येताना फडणवीस यांच्याकडून काहीतरी शब्द मिळवलाच असेल. तो शब्द फडणवीस यांनी पाळला. त्यात फडणवीस यांची चूक असू शकते. पण पडळकर, मोहिते – पाटील, कराड यांची चूक कशी काय असू शकते ?

KhadeVsFadanvis
गोपीचंद पडळकर हे संघर्ष करून पुढे आलेला नेता आहे

गोपीचंद पडळकर यांच्याबाबत बोलायचे झाले तर हा बहुजन व धनगर चळवळीतील कार्यकर्ता आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी मोठी आंदोलन केली आहेत. गेली २० वर्षे ते सतत राजकीय व सामाजिक चळवळीत सक्रीय आहेत. आज सांगली जिल्ह्यात भाजप रूजली आहे, तीच मुळी गोपीचंद पडळकर यांच्यामुळे.

गोपीचंद पडळकर हे मुळात महादेव जानकर यांचे जुने सहकारी. जानकर यांच्यासोबत त्यांचे बिनसल्यानंतर त्यांनी आपली स्वतंत्र चूल मांडली. ते भाजपमध्ये आले. पडळकर भाजपमध्ये आले तेव्हा सांगली जिल्ह्यात भाजपची फार ताकद नव्हती. एखादा आमदार कसाबसा निवडून यायचा.

गोपीचंद पडळकर यांनी ती ताकद वाढविली. खासदार संजय पाटील यांनाही पडळकर यांनीच भाजपमध्ये आणले. संजय पाटील खासदार म्हणून सांगलीतून निवडून आले. दुसऱ्या बाजूला राम शिंदे, महादेव जानकर यांची धनगर समाजातील लोकप्रियता घटत चालली आहे. गोपीचंद पडळकर यांची धनगर व बहुजन समाजातील लोकप्रियता वाढत आहे.

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर भाजपमधून बाहेर पडले. भाजपने धनगर आरक्षणाचा शब्द पाळला नाही या मुद्द्यावर ते भाजपमधून बाहेर पडले होते. त्यावेळी राज्यभर त्यांच्या सभांना धनगर समाजाने अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला.

वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून पडळकर यांनी लोकसभा निवडणूक लढविली. तब्बल ४ लाख मते त्यांना मिळाली. पडळकर यांची ही ताकद व धनगर समाजातील त्यांची लोकप्रियता फडणवीस यांनी हेरली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पडळकर यांना बारामतीमधून अजित पवार यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली. पवार यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची हिंमत पडळकर यांनी दाखविली.

या सगळ्या बाजू लक्षात घेऊनच पडळकर यांना फडणवीसांनी आता विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. खडसे यांनी संघर्ष करून राजकारणात उंची गाठली, तसेच गोपीचंद पडळकर यांनीही संघर्ष केलेला आहे. गेली २० वर्षे त्यांची संघर्षातच गेली आहेत. धनगर समाजातील अन्य कोणत्याही नेत्यापेक्षा गोपीचंद पडळकर यांची त्या समाजात लोकप्रियता अधिक आहे. असे असतानाही खडसे यांनी पडळकर यांच्यावर तोफ डागणे हे सर्वथा चुकीचे आहे.

खडसे यांची भूमिका चुकीचीच

भाजपमध्ये आता आपल्याला स्थान राहिलेले नाही हे खडसे यांनी ओळखायला हवे. उभारत्या तरूणांना संधी का दिली जाते म्हणून थयथयाट करण्यापेक्षा आपले होणारे खच्चीकरण रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना, कॉंग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्हीपैकी कोणत्या तरी एका पक्षात स्वतःचे पुनर्वसन करून घ्यायला हवे.

खरेतर, खडसे यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या या अगोदरच भेटी घेतल्या होत्या. ‘खडसे यांची मागणी पूर्ण करण्याची ताकद माझ्यात नाही’ असे पवार यांनी वक्तव्य केले होते. याचा अर्थ खडसे यांना ‘महाविकास आघाडी’मध्ये चांगले मंत्रीपद दिले गेले असते, तर त्यांनी केव्हाच भाजपला सोडचिठ्ठी दिली असती.

खडसे यांना आपली ताकद दाखवून द्यायची असेल तर त्यांनी पक्षांतर करणे हाच सध्याचा उत्तम मार्ग आहे. त्यांनी उगाचच तरूण नेत्यांना दुषणे देणे योग्य नाही.

खडसेंना तोफा डागायच्याच असतील तर त्यांनी फडणवीस ( KhadseVsFadanvis ) यांच्यासह मोदी – शाह यांच्यावरही डागाव्यात. बहुजन समाजातून पुढे येणाऱ्या तरूण नेतृत्वाला संपविण्यासाठी त्यांनी बेछुट आरोप करायला नकोत, असेच कुणालाही वाटेल.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आम्हाला ट्विटरवर फॉलो करा

हे सुद्धा वाचा

धक्कादायक : महाराष्ट्रात ८१९ पोलिसांना कोरोना

MLC election- शेकडो स्पर्धक असताना राठोड यांनाच संधी मिळण्याची ही आहेत कारणे…

Anil Deshmukh : महाराष्ट्रातील १७ हजार कैद्यांना मुक्त करण्याचा निर्णय

Fadnavis, Mahajan behind denial of poll ticket to me: Eknath Khadse

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी