31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयराजेश टोपेंची उंच उडी, जयंत पाटलांनाही टाकले मागे

राजेश टोपेंची उंच उडी, जयंत पाटलांनाही टाकले मागे

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’मुळे जनतेचे वाटोळे झाले. पण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना ‘कोरोना’ पावला आहे. ‘कोरोना’च्या काळात टोपे यांनी उत्तुंग झेप घेतली आहे (Rajesh Tope has taken a great leap in Corona’s time).

टोपे यांनी घेतलेली ही झेप लोकप्रियतेच्या बाबतीत आहे. ‘कोरोना’ काळात त्यांचे फॉलोअर्स अफाट संख्येने वाढले आहेत.

साधारण जानेवारी २०२० मध्ये ‘कोरोना’ने भारतात आगमन केले. मार्च २०२० मध्ये ‘कोरोना’ची गंभीर पाऊले देशात व महाराष्ट्रात दिसू लागली होती. त्यामुळे मार्च २०२० मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर गुंडाळण्यात आले होते.

Health Minister Rajesh Tope : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे ट्विट; रेमडेसिविरचे 10 हजार इंजेक्शन खरेदी करणार

Rajesh Tope : चांगल्या प्रकृतीच्या ‘कोरोना’बाधितांवर आता घरीच उपचार करणार : राजेश टोपे

त्यावेळी राजेश टोपे यांचे ट्विटरवर अवघे ३ हजार फॉलोअर्स होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये कदाचित टोपे यांचे सर्वात कमी फॉलोअर्स असतील. पण आता टोपे यांचे तब्बल ४.८६ लाख फॉलोअर्स आहेत. अवघ्या दीड वर्षात हजारो पटीने त्यांच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाली (Rajesh Tope’s followers have increased thousands of times).

Health Minister Rajesh Tope has taken a great leap in Corona's time)
कोरोना काळात राजेश टोपेंचे फॉलोअर्स अफाट संख्येने वाढले

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सुद्धा राजेश टोपे यांनी मागे टाकले आहे. जयंत पाटील यांचे ट्विटरवरील फॉलोअर्स आहेत ४.४२ लाख. विशेष म्हणजे, जयंत पाटील यांच्याकडे सोशल मीडिया सांभाळणारी तगडी टीम आहे. या उलट राजेश टोपे यांच्याकडे सोशल मीडियासाठी तगडी टीम नाही.

Health Minister Rajesh Tope has taken a great leap in Corona's time
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सुद्धा राजेश टोपे यांनी मागे टाकले

टोपे यांची सोशल मीडिया टीम दुबळी आहे. प्रसिद्धीतंत्रासाठी त्यांनी फार मनुष्यबळ कामाला लावलेले नाही. तरीही त्यांचे ट्विटरवरील फॉलोअर्स वाढत आहेत.

स्वतंत्र टीम नेमण्यापेक्षा त्यांनी ट्विटवरून प्रभावी माहिती देण्यास सुरूवात केली. ‘कोरोना’च्या आगमनावेळीच त्यांनी ट्विटरवर क्षणक्षणाची माहिती द्यायला सुरूवात केली. दुसऱ्या बाजूला प्रसारमाध्यमांमुळे राजेश टोपे घराघरांत पोचले. त्यांची लोकप्रियता वाढली. त्यामुळे टोपे यांचे ट्विटवर अकाऊंटचेही महत्व वाढले. परिणामी अवघ्या दीड वर्षात राजेश टोपेंचे ट्विटर अकाऊंट महाराष्ट्रातील टॉप टेन नेत्यांमध्ये जाऊन पोचले आहे.

राजेश टोपे यांचे जनतेला अवयव दान करण्याचे आवाहन

Rajesh Tope calls for caution as Delta Plus death toll rises to five

राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, धनंजय मुंडे व जितेंद्र आव्हाड एवढेच नेते टोपे यांच्या पुढे आहेत. जितेंद्र आव्हाड यांना ते लवकरच मागे टाकतील अशी चिन्हे आहेत.

(Health Minister Rajesh Tope has taken a great leap in Corona's time
जितेंद्र आव्हाडांना राजेश टोपे लवकरच मागे टाकतील अशी चिन्हे दिसत आहेत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी