33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeक्रीडाहार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून 'आउट', 'हा' खेळाडू 'इन'

हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून ‘आउट’, ‘हा’ खेळाडू ‘इन’

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी असून भारताचा स्टार खेळाडू ऑलराउंडर हार्दिक पांड्या हा वर्ल्ड कपमधील पुढील सामने खेळू शकणार नाही. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात खेळताना पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. परंतु, काही दिवसांनंतर तो पुन्हा टीममध्ये समाविष्ट होईल अशी अपेक्षा होती. मात्र आता तो पूर्णपणे फिट नसल्यामुळे उर्वरित स्पर्धेत खेळू शकणार नाही. यामुळे भारतीय क्रिकेट संघाला जबर धक्का पोहोचला असून उपांत्य फेरी गाठलेल्या भारतीय संघासमोर हार्दिकच्या अनुपस्थितीमूळे नवे आव्हान असणार आहे. या बातमीमुळे भारतीय क्रिकेट चाहते निराश झाले आहेत. हार्दिक पांड्याने यावर आपली प्रतिक्रिया देत, “वर्ल्डकपमध्ये खेळू शकत नसल्यामुळे स्वत:ला समजावणे अवघड असून मी मनाने टीमसोबतच असेल,” असे म्हटले आहे.

पुण्यातील गहूंजे स्टेडीयम येथे 19 ऑक्टोबर रोजी झालेल्या भारत वि. बांगलादेश सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिकच्या पायाला दुखापत झाली होती. त्याच्या षटकामधील उर्वरित 3 चेंडू विराट कोहली याने टाकले होते. हा सामना भारताने 7 विकेट्सने जिंकला होता. त्यानंतर, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात हार्दिक दुखापतीमुळे खेळला नव्हता. परंतु, तो पूर्णपणे फिट होऊन पुन्हा संघात येईल अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहत्यांना होती. पण आता हार्दिकच्या स्पर्धेतून बाहेर पडण्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)


काय म्हणाला हार्दिक पंड्या?

हार्दिकला उर्वरित वर्ल्डकपमध्ये सहभागी होता येणार नाही आहे. यावर, त्याने आपली प्रतिक्रिया दिली असून तो म्हणाला, “मी वर्ल्ड कपचे उर्वरित सामने खेळू शकणार नाही हे मनाला समजावणं खूप कठीण आहे. मी टीमसोबतच असेन, त्यांना प्रोत्साहित करेन. तुमच्या शुभेच्छा, प्रेम आणि आधारासाठी खुप खूप धन्यवाद! ही टीम स्पेशल आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही अभिमानास्पद कामगिरी करू.”


हार्दिक पांड्याच्या जागी बदली खेळाडू म्हणुन प्रसिद्ध कृष्णा याला संघात स्थान देण्यात आले आहे. प्रसिद्ध कृष्णा हा जलदगती गोलंदाज असून वर्ल्ड कप स्पर्धेआधी निवडलेल्या 17 खेळाडूंच्या संघात त्याचा समावेश होता. मात्र, अंतिम संघातून त्याला वगळण्यात आले होते. आता पुन्हा हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे त्याला संघात स्थान मिळाले असून उर्वरित सामन्यात अंतिम 11 मध्ये त्याला संधी मिळते का हे पहावे लागणार आहे.

हे ही वाचा 

भारत आणि श्रीलंका सामन्यापूर्वीच भारताच्या डोकेदुखीत वाढ

विजयाची ‘सप्तपदी’ आणि कोहलीच्या रेकॉर्डची आस

साक्षात क्रिकेटचा देव मैदानात उभा ठाकतो तेव्हा…

भारताची विजयी घोडदौड

भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सातही सामन्यात विजय मिळवला असून एकूण 14 गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. गुरुवारी, (2 नोव्हेंबर) रोजी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताचे पुढील सामने रविवारी (5 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि रविवारी (12 नोव्हेंबर) नेदरलँड विरुद्ध होणार आहेत. त्यानंतर, 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी सेमीफायनल आणि 19 नोव्हेंबर रोजी फायनल सामना होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी