31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाINDvsPAK : अखेर 15 वर्षानंतर टीम इंडिया करणार पाकिस्तान दौरा! जाणून घ्या...

INDvsPAK : अखेर 15 वर्षानंतर टीम इंडिया करणार पाकिस्तान दौरा! जाणून घ्या काय आहे विशेष कारण

15 वर्षानंतर भारतीय संघ क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयने पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

गेल्या 15 वर्षापासून टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्याक एकही मालिका खेळवली गेली नाही. त्यानमुळेच भारतीय संघाने पाकिस्तान दौरा केलेला नाही. शिवाय पाकिस्तानी संघाला देखील क्रिकेट खेळण्यासाठी भारतात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, आता 15 वर्षानंतर भारतीय संघ क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. फ्युचर टूर्स कार्यक्रमानुसार, पाकिस्तान 2023 मध्ये आशिया कपचे आयोजन करेल जो एकदिवसीय स्वरूपात खेळला जाईल. बीसीसीआयने आपले पर्याय खुले ठेवले आहेत. मात्र, पाकिस्तानसोबतचे राजनैतिक संबंध ताणले गेल्याने अंतिम निर्णय भारत सरकार घेईल. सरकारच्या मंजुरीनंतरच बीसीसीआय कोणतेही पाऊल उचलेल.

क्रिकबजमधील वृत्तानुसार, 18 ऑक्टोबर रोजी होणार्‍या BCCI च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (AGM) आधी, त्यांच्या संलग्न राज्य संघटनांना एक परिपत्रक पाठवले गेले आहे. त्यात आशिया चषकासह पाकिस्तानमध्ये सहभागी होणाऱ्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांची यादी आहे. पुढील वर्षी तीन विश्वचषक स्पर्धा होणार आहेत ज्यात महिला T20 विश्वचषक, महिला अंडर-19 विश्वचषक आणि ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक यांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचा डबलवार! ठाकरेंचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचा जिल्हाप्रमुख एकाच दिवशी शिंदेगटात सामील

Asaduddin Owaisi : ‘ज्यांना बिकीनी घालायची आहे त्यांनी…’ हिजाब प्रकरणाच्या निर्णयावर बोलताना औवैसींची जीभ घसरली

Maharashtra Politics : रायगड राखण्यासाठी फडणवीसांचा मास्टर प्लॅन! ‘तटकरें’च्या घराण्यातील व्यक्ती भाजपच्या मार्गावर

आशिया चषकाशिवाय या सर्व जागतिक स्पर्धांमध्ये भारत सहभागी होणार आहे. 2008 च्या मुंबई हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला गेलेला नाही. क्रिकबझने बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, “नेहमीप्रमाणेच भारत सरकारच्या मान्यतेच्या अधीन असेल.” दुसरीकडे, फ्युचर टूर प्रोग्राम अंतर्गत, भारत आणि पाकिस्तानचे संघ 2023-2027 पर्यंत द्विपक्षीय मालिकेत आमनेसामने येणार नाहीत. बीसीसीआयने सर्व राज्य संघटनांना माहिती दिली आहे. पाकिस्तानसोबतची कोणतीही द्विपक्षीय मालिका भारत सरकारच्या मर्जीनुसारच ठरवली जाईल.

अनेक जागतिक स्पर्धा असूनही, भारतीय पुरुष क्रिकेट संघ 2023-2027 चक्रात 38 कसोटी सामने खेळणार आहे, ज्यात 20 मायदेशात आणि 18 परदेशात आहेत. भारतीय संघ मायदेशात 21 सामने आणि परदेशात तितकेच एकदिवसीय सामने खेळणार आहे. या कालावधीत भारताला घरच्या मैदानावर 31 आणि बाहेर 30 टी-20 खेळायचे आहेत. म्हणजेच एकूण 61 टी-20 सामने होणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी