33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाINDvsSA ODI : भारताने उडवला आफ्रिकेचा धुव्वा! टीम इंडियाचा 2-1ने मालिका विजय

INDvsSA ODI : भारताने उडवला आफ्रिकेचा धुव्वा! टीम इंडियाचा 2-1ने मालिका विजय

दक्षिण आफ्रिकेचा संघ 3 टी20 आणि 3 एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. या मालिकेत टी20नंतर आता वनडेमध्येही भारताने चषक जिंकला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ 3 टी20 आणि 3 एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. या मालिकेत टी20नंतर आता वनडेमध्येही भारताने चषक जिंकला आहे. विशेष म्हणजे वनडे मालिकेत भारताकडून अनेक युवा खेळाडू खेळत होते. अशा परिस्थितीतही भारताने आफ्रिकेला पराभूत केल्यामुळे आफ्रिकी संघाचे टेन्शन वाढले आहे. भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सात विकेट्सने मात करत तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी 100 धावांचे लक्ष्य ठेवले होते, भारतीय संघाने तीन गडी गमावून हे लक्ष्य गाठले. भारताने याआधी टी-20 मालिकेतही दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता.

तत्पूर्वी, भारताचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हेन्रिक क्लासेन (३४ धावा) वगळता एकाही फलंदाजाला टिकाव धरता आला नाहीडेविड मलानने 15 आणि मार्को यान्सनने 14 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे आठ फलंदाज दहाचा आकडा गाठू शकले नाहीत. डी कॉकने सहा धावा, रीझा हेंड्रिक्सने तीन धावा, ऍडम मार्करमने नऊ धावा, कर्णधार डेव्हिड मिलरने सात धावा, फेहलुकवायोने पाच धावा आणि ब्योर्न फोर्टेनने एक धावा काढल्या. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 27.1 षटकांत ९९ धावांत गारद झाला. भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 1999 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ 117 धावांत ऑलआऊट झाला होता.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : आता ठरलंय! उद्धव ठाकरेंच्या मशालीला रोखण्यासाठी शिंदेंची ढाल-तलवार सज्ज

Beed News : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या निकटवर्तीयाची आत्महत्या, गोळी झाडून संपवले जीवन

Amit Thackeray : मनसे शहराध्यक्षाचा मित्राकडून खून, अमित ठाकरे कुटुंबियांच्या भेटीला

भारताकडून कुलदीप यादव हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने चार षटकांच्या स्पेलमध्ये 18 धावांत चार बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदरने चार षटकांत 15 धावा देत दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मोहम्मद सिराज आणि शाहबाज अहमद यांनाही प्रत्येकी दोन विकेट्स मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने शिखर धवनची (08 धावा) विकेट लवकर गमावली. शिखर धवन धावबाद झाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्फोटक खेळी करणाऱ्या इशान किशनलाही (10 धावा) मोठी खेळी करता आली नाही. मात्र दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या शुभमन गिलने आघाडी राखली. शुभमन गिलने श्रेयस अय्यरसोबत 39 धावांची भागीदारी करून संघाचा विजय निश्चित केला. शुभमन गिलचे अर्धशतक हुकले आणि तो 49 धावांवर बाद झाला. भारतीय संघाने 19.1 षटकात सामना जिंकला. श्रेयस अय्यरने 23 चेंडूत 28 आणि संजू सॅमसनने दोन धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेचा वाढलेला तणाव:
या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेला वर्ल्डकपसाठी वर्ल्ड सुपरलीगच्या टॉप आठमध्ये स्थान मिळवता आले नाही. या यादीत अकराव्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला आता पुढील वर्षी झिम्बाब्वेविरुद्ध क्वालिफायर सामना खेळावा लागणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी