क्रीडा

शुभमनच्या सिक्सने बॉल हरवला अन् नेटकऱ्यांनी ट्विटर गाजवलं

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये बॉर्डर – गावस्कर ट्रॉफीतील चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. बॉर्डर – गावस्कर ट्रॉफी 2023 मधील हा शेवटचा सामना आहे. या सामन्यातील पहिल्या डावाचत ऑस्ट्रेलियाने धमाकेदार फलंदाजी करत 480 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करत असताना भारतीय संघाला दुसऱ्या दिवशी 10 ओव्हर्स खेळणे गरजेचे होते. या दुसऱ्या दिवशीच्या खेळातील शेवटच्या षटकांत भारताचा सलामीवीर शुभमन गिलने एक सिक्स मारला अन् बॉल गायब झाला. त्यानंतर जे काही झालं ते सर्व प्रेक्षकांना मनोरंजित करणारं होतं.

हे सुद्धा वाचा

भाऊराव कऱ्हाडे यांचा गावराण तडका; ‘टीडीएम’ चित्रपटात पिंगळा गाणार शिवरायांची गाथा

‘या’ कारणामुळे इलियाना डिक्रूझला तमिळ सिनेसृष्टीने केले बॉयकॉट

महिला डॉक्टरची हत्या करून आत्महत्या करण्याचा तरुणाचा प्रयत्न; जम्मूतील धक्कादायक घटना उघडकीस

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ 480 धावांवर गुंडाळला. त्यानंतर भारतीय संघाला 10 ओव्हर्स फलंदाजी करणे गरजेचे होते. ही धुरा सांभाळण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा अन् सलामीवीर शुभमन गिल मैदानात उतरले. दोघांनीही चांगली फलंदाजी करत भारताची धावसंख्या दिवसअखेर बिनबाद 36 धावांवर पोहोचली. यावेळी दिवसातील शेवटची ओव्हर टाकण्यासाठी नेथन लायन गोलंदाजीसाठी आला. यावेळी ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर शुभमन गिलने समोरच्या बाजूला एक खणखणीत फटकार लगावला. बॉल बाऊंड्री लाईच्या पलिकडे गेला अन् अचानक गायब झाला. त्यावेळी बॉल शोधण्यासाठी सामना जवळपास 5 ते 10 मिनिटे थांबवण्यात आला होता.

त्यानंतर सामना पुर्ववत सुरू करण्यासाठी नविन बॉल घेण्याचा निर्णय करण्यात आली. मात्र, सामना पाहण्यासाठी उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांपैकी एकाने थेट बांधलेल्या पडद्यांवर चढून बॉल शोधण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रेक्षक थेट साईड स्क्रिन पर्यंत पोहोचला. मात्र, त्याला आसपास कुढेही बॉलि दिसला नाही. त्यानमुळे बॉल नक्की कुठे गेला हे पाहण्यासाठी मैदानातील मोठ्या स्क्रिनवर रिप्ले दाखवण्यात आला आणि त्याच्या मदतीने बॉल शोधण्.यात आला. मात्र, हे सगळं होत असताना सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू मैदानावर एकटक उभे होते. याते स्क्रिनशॉट शे्र करत अनेकांनी ट्विटरवर ऑस्ट्रेलियन संघाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. शिवाय बॉल शोधणाऱ्या पठ्ठयाचा फोटोही अगदी क्षणात व्हायरल होण्यास सुरुवात झाली.

प्रणव ढमाले

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

2 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

2 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

3 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

3 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

9 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

10 hours ago