33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमनोरंजन'या' कारणामुळे इलियाना डिक्रूझला तमिळ सिनेसृष्टीने केले बॉयकॉट

‘या’ कारणामुळे इलियाना डिक्रूझला तमिळ सिनेसृष्टीने केले बॉयकॉट

इलियाना डिक्रूझ नुकतीच तिच्या प्रकृतीतील अस्वास्थ्यामुळे चर्चेत होती, ज्याची माहिती तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली होती. बॉलिवूडपासून साऊथ चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या अभिनेत्रीबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इलियाना डिक्रूझ हिच्यावर तमिळ चित्रपट सृष्टीत काम करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

इलियाना डिक्रूझ नुकतीच तिच्या प्रकृतीतील अस्वास्थ्यामुळे चर्चेत होती, ज्याची माहिती तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली होती. बॉलिवूडपासून साऊथ चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या अभिनेत्रीबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इलियाना डिक्रूझ हिच्यावर तमिळ चित्रपट सृष्टीत काम करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

तामिळ चित्रपट उद्योगाने इलियाना डिक्रूझवर बंदी घातली आहे का?
तमिळ रिपोर्ट्सनुसार, एका तमिळ निर्मात्याने तक्रार दाखल केली आहे की इलियाना डिक्रूझ ऍडव्हान्स पैसे घेऊनही शूटसाठी आली नाही. यामुळे निर्मात्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तेव्हापासून तामिळ निर्माते इलियानाला त्यांच्या चित्रपटात घेण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. तसेच इलियानाच्या टीमनेही याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

हे सुद्धा वाचा

महिला डॉक्टरची हत्या करून आत्महत्या करण्याचा तरुणाचा प्रयत्न; जम्मूतील धक्कादायक घटना उघडकीस

नात्याला काळिमा : सासरच्यांनी केले अमानुष कृत्य; सुनेचे हातपाय बांधून मासिक पाळीतील रक्त विकण्याचा अघोरी प्रकार

“तिच्यासारखं सुंदर दिसण्यापेक्षा…” पाहा काय म्हणतेय तेजश्री प्रधान

काही दिवसांपूर्वी एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये हॉस्पिटलची छायाचित्रे शेअर करताना इलियाना डिक्रूझने लिहिले होते की, ‘एक दिवस किती बदलू शकतो…’ अभिनेत्रीच्या खराब प्रकृतीमुळे चाहत्यांची चिंता वाढली होती, प्रत्येकजण तिच्या लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करत होता. तिला हॉस्पिटलमध्ये का दाखल करण्यात आले हे अभिनेत्रीने स्पष्ट केले नाही.

इलियाना डिक्रूजचा ‘अनफेअर अँड लव्हली’ चित्रपट बऱ्याच दिवसांपासून अडकला आहे. या चित्रपटात तिची जोडी रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. 2020 मध्येच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती, परंतु अद्याप याविषयी कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. वर्णभेदावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन बलविंदर सिंग जंजुआ करत आहेत. हा एक कॉमेडी चित्रपट असेल, ज्यामध्ये इलियाना एका डस्की मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी