31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयमनसेच्या नेतेपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती, मनसेच्या नवा झेंड्याचेही अनावरण

मनसेच्या नेतेपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती, मनसेच्या नवा झेंड्याचेही अनावरण

टीम लय भारी

मुंबई : राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. गोरेगाव येथे मनसेचे महाअधिवेशन सुरू आहे. या महाविधेशनात ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्याबाबत बाळा नांदगावकर यांनी ठराव मांडला होता. त्याला सर्व पदाधिकाऱ्यांनी आवाजी मतदानाने मंजुरी दिली. त्यानंतर नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड झाल्याची घोषणा केली.

मनसेच्या नेतेपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती, मनसेच्या नवा झेंड्याचेही अनावरण

अमित ठाकरे यापूर्वीच मनसेमध्ये सक्रीय झाले होते. आता त्यांची नेतेपदी निवड झाली आहे. या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांचे दुसरे नातू राजकारणात आले आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे राजकारणात आले होते. आदित्य ठाकरे आमदार झाले आणि नंतर मंत्रीही झाले.

मनसेच्या नेतेपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती, मनसेच्या नवा झेंड्याचेही अनावरण
जाहिरात

मनसेच्या या महाअधिवेशनात राज ठाकरे यांच्या हस्ते नव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. सत्ताधारी ‘महाविकास आघाडी’ सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. सत्ताधारी पक्षातील विविध खात्यांचे शॅडो मंत्री म्हणून मनसेतील नेत्यांची नियुक्ती केली जाईल. हे नेते सत्ताधारी मंत्र्यांच्या कारभारावर लक्ष ठेवतील. त्यांच्या कामातील चुका, उणिवा व गैरप्रकार शोधून ते जनतेसमोर मांडतील. यापूर्वी ‘भारतीय जनता पक्षा’ने ‘काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस’ ‘लोकशाही आघाडी सरकार’च्या काळात अशा पद्धतीने शॅडो कॅबिनेट स्थापन केली होती.

हे सुद्धा वाचा

Exclusive : ‘Link’ मध्ये स्पेस पडली अन् सहकार आयुक्तांचे निलंबन झाले

भाजप शिवसेनेच्या पाठी फिरतेय, अन् शिवसेना काँग्रेस – राष्ट्रवादीकडे भीक मागतेय : मनसेचा निशाणा

…अन्यथा, शिवसेना भवन परिसरातला कचराच उचलणार नाही : मनसेचा इशारा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी