29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयमाणसातला राम महत्वाचा, की दगडातला ?

माणसातला राम महत्वाचा, की दगडातला ?

‘राम मंदिर’ बांधल्यामुळे ‘कोरोना’ संपुष्टात येईल असे काहीजणांना वाटते’ अशा आशयाचे विधान शरद पवार ( Sharad Pawar’s statement on Ram Mandir ) यांनी नुकतेच केले आहे. त्यावरून हिंदूत्ववादी संघटना व समर्थकांकडून पवार यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी हिंदूत्ववाद्यांचा ‘समाचार’ घेतला आहे.

advt
जाहिरात

आम्ही प्रत्येक माणसात ‘राम’ बघतो. ‘आत्माराम ‘ महत्वाचा आहे. त्याचीच सेवा महत्वाची असते. मानवसेवा हीच ईश्वरसेवा मानली गेली आहे. हीच शिकवण आमच्या सर्व संतांनी दिली आहे. सर्व महात्मे सजीवसृष्टी महत्वाची मानत होते. आम्हाला संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत कबीर यांचे तत्वज्ञान पचत नाही फक्त त्यांचे फोटो हवे आहेत.

देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळाने देश उभारणी करताना शिक्षण , आरोग्य, अन्न , वस्त्र , निवारा , शेती , उद्योग व दळणवळण इत्यादी सर्वांगीण विकासासाठी प्रथम प्राधान्य दिले होते.म्हणूनच आजचा भारत देश सर्वांगीण प्रगती करत उभा आहे. राज्य घटनेने श्रद्धा व उपासना यांचे व्यक्तीस्वातंत्र्य देत असतानाच वैज्ञानिक दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा मानलेला आहे.

Advt
जाहिरात

सन 1990 पासून देशात मंदिर – मस्जिद असा वाद उभा करताना धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय स्वार्थ साधण्याचे कुटील राजकारण आजही आरएसएस व भाजप करत आहेत.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांकडून ‘रयत’वर आणखी एका IAS अधिकाऱ्याला संधी

Politics : सत्ता गेल्यामुळेच भाजपच्या नेत्यांनी ताळतंत्र सोडलेय, शरद पवार यांची इच्छा असेल तरच सरकार पडेल : अनिल गोटे

मानवाच्या  शिक्षण- आरोग्य – रोजगार इत्यादी दैनंदिन जगण्याचे प्रश्न त्यांना कधीच महत्वाचे वाटले नाहीत. किती वर्षे मंदिर मस्जिद याच्यावर बिनकामी चर्चा व घाणेरडे राजकारण करणार आहात ( Politics on Ram Mandir ) ?

आजच्या कोव्हीड – 19 ( Coronavirus )  सारख्या भयंकर संकटाचा सामना करताना जगभरात फक्त हॉस्पिटल्स, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपयोगी पडली आहेत. मंदिर, मस्जिद, चर्च इत्यादी कोणतेच प्रार्थना स्थळ अथवा पुजारी, भटजी, मौलवी, पाद्री उपयुक्त ठरलेले नाहीत.

advt
जाहिरात

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सद्यस्थितीत राम मंदिरापेक्षा जनतेच्या आरोग्य प्रश्नाला प्राधान्य द्यावे असे मत व्यक्त केल्याबद्दल स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या सर्वांना भूमिका पटलेली असणार ( Sharad Pawar’s statement on Ram Mandir is acceptable ).

अंध भक्त मंडळी प्रचंड अस्वस्थ झाली आहेत ( Narendra Modi supporters disturbed on Sharad Pawar’s Statement on Ram Mandir ) . त्यांची अस्वस्थता अत्यंत ढोंगीपणाची आहे. ज्यांना हॉस्पिटलपेक्षा मंदिर महत्वाचे वाटते त्यांनी कोरोना ग्रस्त बांधवांची किंवा कोणत्याही रुग्ण व्यक्तींची मुलाखत घ्यावी.

श्रीराम जनतेचे श्रध्दास्थान आहे. जनतेच्या श्रद्धेवर आपली राजकीय पोळी भाजून काय साध्य करणार आहात ? हा खटाटोप सत्तेसाठीच ना ? श्रीराम माणसांत आहेत. प्रत्येक सजीवांत आहेत. आम्हाला संत शिकवण कधी कळणार आहे ?

आमचे मिळालेले शिक्षण आम्हाला अंधश्रद्ध बनवत असेल किंवा श्रद्धा व अंधश्रद्धा यातील आम्हाला फरक कळत नसेल तर मिळालेले शिक्षण कुचकामी ठरते. ती शैक्षणिक डिग्री कचऱ्यात जमा करायला हवी.

माणसातला राम जगला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करूया व आत्मारामाची सेवा करूया.

विकास लवांडे (9850622722)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी