27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमुंबईरमजान महिन्यात मुंबईतील मुस्लीम वस्तीत दुषित पाणीपुरवठा

रमजान महिन्यात मुंबईतील मुस्लीम वस्तीत दुषित पाणीपुरवठा

सध्या रमजान महिना सुरू असून भायखळा, हंस रोड येथील पत्राचाळीच्या रहिवाशांना दूषित पाण्याचा पुरवठा केला जातोय. इथे 100 टक्के मुस्लिम वस्ती आहे. पालिकेत तक्रार करूनही पालिका अधिकारी काहीच दखल घेत नाही, असा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा. संदीप शिंदे यांनी केला आहे.

भायखळा पश्चिमेस दगडी चाळीच्या समोर पत्रा चाळ ही वस्ती आहे. झोपपट्टी वजा चाळ अशी वस्तीची रचना आहे. वस्तीत मुस्लिम समाज मोठ्या संख्येने राहतो. सध्या रमजान महिना सुरू असल्याने त्यांचे रोजे सुरू आहेत. याच कालावधीत इथली गटार लाईन फुटली आहे.त्याच पाणी पिण्याच्या पाण्याच्या सप्लाय लाईन मध्ये मिक्स होत आहे. आणि तेच पाणी रहिवाशीच्या घरात पोहचत आहे, असे प्रा. गणेश शिंदे यांचे म्हणणं आहे.

जी गटार लाईन फुटली होती ती मी आमच्या सम्राट शेअर आणि केअर या सामाजिक संस्थेच्या वतीने बनवून दिली आहे. मात्र, इतर मेजर दुरूस्ती करायला पालिका अधिकारी तयार नाहीत. तुम्ही ते आमदार किंवा नगरसेवक निधीतून बनवून घ्या असा सल्ला पालिका अधिकारी देत आहेत. या प्रश्नाकडे कोणालाही पाहायला वेळ नाही.

हे सुद्धा वाचा 

शिंदे सेनेचे कार्यकर्ते विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना

रॅपर उमेश खाडेची सुटका करा; जितेंद्र आव्हाड यांची मागणी

शरद पवारांकडून अदानी यांची पाठराखण ही त्यांच्या पक्षाची भूमिका : नाना पटोले

मी आणि माझी बायको डॉ. मयुरी शिंदे आम्ही आमच्या सम्राट शेअर ऍण्ड केअर या संस्थेतर्फे काम करत अहोत. पत्रा चाळीतील रहिवाशांना भर रोजाच्या काळात दूषित पाणी प्यावे लागत आहे. याबाबत पालिकेने तात्काळ दुरुस्ती न केल्यास आम्हाला तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, अस ही प्रा. गणेश शिंदे यांनी संगीतलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी