32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयकर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले हा नारीशक्तीचा, मातृशक्तीचा अपमान नाही का. नारीशक्ती, मातृशक्ती या भाजपाच्या पोकळ घोषणा आहेत. मागील १० वर्षांच्या भाजपा राजवटीत देशभरात लाखो महिलांवर अत्याचार झाले, भाजपा खासदार ब्रिजभूषणसिंह याने महिला खेळाडूंवर अत्याचार केले पण त्याचावरही कारवाई केली नाही. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले त्यावर भाजपा व नरेंद्र मोदी काहीही बोलले नाहीत. भाजपा राजवटीत महिला सुरक्षित नाहीत असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटी मीडिया विभागाच्या महाराष्ट्र समन्वयक प्रगती अहिर यांनी केला.

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले हा नारीशक्तीचा, मातृशक्तीचा अपमान (Atrocities in Karnataka are an insult to women’s power) नाही का. नारीशक्ती, मातृशक्ती या भाजपाच्या पोकळ घोषणा आहेत. मागील १० वर्षांच्या भाजपा (BJP) राजवटीत देशभरात लाखो महिलांवर अत्याचार झाले, भाजपा (BJP) खासदार ब्रिजभूषणसिंह याने महिला खेळाडूंवर अत्याचार (Atrocities) केले पण त्याचावरही कारवाई केली नाही. मणिपूरमध्ये महिलावर अत्याचार झाले त्यावर भाजपा व नरेंद्र मोदी काहीही बोलले नाहीत. भाजपा राजवटीत महिला सुरक्षित नाहीत असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटी मीडिया विभागाच्या महाराष्ट्र समन्वयक प्रगती अहिर ( Pragati Ahir) यांनी केला.(Atrocities in Karnataka are an insult to women’s power; Congress spokesperson Pragati Ahir slams BJP)

त्या नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
प्रगती अहिर याची रेवन्नाने ब्लॅकमेल करुन महिलांवर अत्याचार केले व त्यांचे व्हिडिओही बनवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नराधमासाठी मते मागितली तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी याचा उल्लेख श्री. रेवन्ना असा केला. प्रज्वल रेवन्नाने केलेले गुन्हे अत्यंत गंभीर असून त्याच्या मुसक्या आवळून कडक कारवाई केली पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड, राजेंद्र बागुल आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

प्रज्वल रेवन्ना याच्या सेक्स स्कँडलची माहिती भारतीय जनता पक्षाला होती, असे असतानाही भाजपाने जेडीएसबरोबर कर्नाटकात युती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रज्वल रेवन्नाचा प्रचारही केला. रेवन्नाला मत म्हणजे मोदीला मत असे मोदी म्हणाले. हजारो महिलांवर अत्याचार करणारा प्रज्वल्ल रेवन्ना मोदीशाह यांच्या नाकाखालून परदेशात पळला कसा. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कुटुंबाच्या वैयक्तीक कामासाठी किंवा उपचारासाठी परदेशात गेल्याची माहिती नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी असते पण रेवन्ना पदेशात पळून गेला याची माहिती कशी मिळाली नाही असा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेसच्या वचननामा मध्ये नारी न्याय, युवा न्याय,जातीनिहाय जनगणना, किसान न्याय आणि श्रमिक न्याय या पाच प्रमुख गोष्ठी आहेत. महिला अत्याचार रोखण्यासाठी फास्ट ट्रक कोर्ट, दरमहा ८५०० आर्थिक मदत, युवा न्याय अंतर्गत यापूर्वी जशी सैनिकी भरती होत असे तसी सैनिकी भरती, जातीनिहाय जनगणना झाल्यास त्या त्या जातींना सवलती मिळू शकतात, शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पटचे जे स्वप्न भाजपने दाखवले त्याचे पुढे काय झाले हे सर्वाना माहित आहे.शेतकरी कांदा विक्रीसाठी गेला तर त्याला भाव मिळत नाही मात्र व्यापारी चांगल्या दरात कांदा विक्री करतो . त्यामुळे वचननामा मढी सर्व गोष्टीची पूर्तता जी काही राज्यात केली आहे ती संपूर्ण देशाला केली जाईल असे अहिर म्हणाल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी