32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत गट मेळावे,मतदार शपथ, सायकल रॅली पथनाट्य या माध्यमातून मतदारांची जनजागृती करून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. नवीन नाशिक विभागातील ठाकरे सभागृह येथे महिला बचत गट यांचा मेळावा घेण्यात आला. यात १००० ते १२०० महिला उपस्थित होत्या. उपस्थित महिलांना मतदानाची शपथ देण्यात आली. मतदान केंद्रावर उपलब्ध किमान सुविधांची माहिती देण्यात आली. तसेच माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत हरित शपथ देण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत गट मेळावे,मतदार शपथ, सायकल रॅली (cycle rally) पथनाट्य या माध्यमातून मतदारांची जनजागृती ( voters through various activities) करून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. नवीन नाशिक विभागातील ठाकरे सभागृह येथे महिला बचत गट यांचा मेळावा घेण्यात आला. यात १००० ते १२०० महिला उपस्थित होत्या. उपस्थित महिलांना मतदानाची शपथ देण्यात आली. मतदान केंद्रावर उपलब्ध किमान सुविधांची माहिती देण्यात आली. तसेच माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत हरित शपथ देण्यात आली.(Awareness was created among the voters through various activities including cycle rally in CIDCO division.)

मेळाव्यातील उपस्थित महिलांना मतदान जनजागृती करण्याचे आवाहन विभागीय अधिकाऱ्यांनी केले.यावेळी सातपूर विभागीय अधिकारी अंबादास गरकळ व अधीक्षक दातीर व इतर सर्व अधिकारी उपस्थित होते. नाशिक सायकलिस्ट असोसिएशन व नाशिक महानगरपालिका नवीन नाशिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान ते राजे संभाजी स्टेडियम नवीन नाशिक ते गुरू गोविंदसिंग कॉलेज या मार्गावर सायकल रॅली काढण्यात आली.त्यात मतदार जनजागृतीच्या घोषणा देण्यात येत होत्या.त्यामुळे ही सायकल रॅली लक्षवेधक ठरली.

राजे संभाजी स्टेडियम येथे पथनाट्य सादर करण्यात आले उपस्थितांनी या पथनाट्यास उस्फुर्त प्रतिसाद दिला.विभागातील आधार जेष्ठ नागरिक संघ व गोविंद नगर जेष्ठ नागरिक संघ मधील सदस्यांना मतदानाची शपथ देण्यात आली व वोटर हेल्पलाईन अँप बद्दल प्रात्यक्षिक संघातील सदस्यांनीच करून दाखवले व आपले मतदान केंद्र घरी बसल्या कसे शोधता येईल याबद्दल माहिती दिली. नविन नाशिक विभागातील उत्तम नगर कॉलेज परिसर, गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक व पाटील नगर उद्यान येथे मतदान जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले व उपस्थित नागरिकांना मतदान करणेसाठी जनजागृती करून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. नविन नाशिक विभागातील २०० स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नविन नाशिक विभागातील प्रभाग निहाय जाणाऱ्या घंटागाडीवर ध्वनीफीत द्वारे मतदान जनजागृती केली जात आहे.तसेच पाटील नगर जॉगिंग ट्रॅक, पवन नगर जॉगिंग ट्रॅक व गमाणे मैदान या ठिकाणी ट्रॅक वरील साईड सिस्टिम द्वारे मतदान जनजागृती करण्यात येणार आहे.  नविन नाशिक विभागातील पांडव लेणी परिसरात नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात आली. तसेच ऑडिओ क्लिप द्वारे जनजागृती करण्यात आली. नवीन नाशिक विभागात स्वीप उपक्रमांतर्गत प्रभावीपणे जनजागृती राबविण्यात येत आहे. विभागीय अधिकारी यांच्यासह विभागातील अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी