राजकीय

भाजप आमदारावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; उच्च न्यायालयाने नाकारला आहे जामीन, तरीही मंत्रीपदासाठी लॉबिंग !

टीम लय भारी

मुंबई : महिनाभरापूर्वी भाजपच्या एका आमदारावर ॲट्रॉसिटीचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा इतका गंभीर आहे की, आमदार महोदय अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. पण न्यायालयानेही त्यांचा जामीन फेटाळला आहे.
आमदार महोदयांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची वेळ मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. म्हणून तूर्त आमदारांच्या हातात अद्याप बेड्या पडलेल्या नाहीत. गेल्या 15 – 20 वर्षांत या आमदार महोदयांवर अर्धा डझनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. यातील राजकीय गुन्हे फारसे नाहीत. जे गुन्हे दाखल आहेत, त्यातील बहुतांश गुन्हे ‘क्रिमीनल’ व गंभीर घोटाळ्यांच्या संबंधित आहेत.
गुन्ह्यांची माळ गळ्यात घालून फिरणाऱ्या या भाजप आमदाराला आता मंत्रीपद हवंय. जयकुमार गोरे असे या आमदाराचे नाव आहे. गोरे हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी ते पृथ्वीराज चव्हाणांच्या मागेपुढे करायचे. चव्हाण यांचा विश्वास संपादन करून ते त्यांच्या गळ्यातील ताईत बनले होते.

हे सुद्धा वाचा 

भाजप आमदार जयकुमार गोरेंवर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल

Balasaheb Thorat : महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी आमदार जयकुमार गोरेंची घेतली फिरकी…

भाजप आमदार जयकुमार गोरेला पत्रकार तुषार खरात यांचे झणझणीत प्रत्युत्तर

पण सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी गोरे महाशयांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळच्या प्रचारसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली होती. भाजपची सत्ता आली तर जयकुमार गोरे यांना मंत्रीपद देण्याचे त्यांनी भर सभेत जाहीर केले होते.
पण त्यानंतर राज्यात ‘महाविकास आघाडी’ची सत्ता आली. त्यामुळे जयकुमार गोरे यांना मंत्रीपद मिळू शकले नाही. मात्र ठाकरे सरकार कोसळल्यामुळे येत्या दोन – चार दिवसांत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळावा, अन् जयकुमार गोरे यांना मंत्रीपद द्यावे, अशी मागणी गोरे समर्थकांकडून करण्यात येत आहे. पण इच्छा असून फडणवीस यांना गोरेंना मंत्रीपद देणे शक्य होणार नाही. जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. ताज्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांत तर त्यांना अटकपूर्व जामीन सुद्धा नाकारलेला आहे. अशा परिस्थितीत गोरे यांना मंत्रीपद देणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. तरीही मंत्रीपद मिळावे म्हणून गोरे यांच्याकडून जोरदार लॉबिंग सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

जूनच्या अखेरीस मुंबईत पावसाची हजेरी

भुस्खलनात 60 हून अधिक जवानांचा मृत्यू

फडणवीस सरकारमध्ये कुणाला मिळणार मंत्रीपदे ?, यादी व्हायरल

 

नवेली कांबळे

Naveli Kamble is a reporter/ sub editor.

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

19 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago