33 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयचंद्रकांत पाटील अचानक गेले फडणविसांच्या बंगल्यावर, दोन तास केली गहन चर्चा

चंद्रकांत पाटील अचानक गेले फडणविसांच्या बंगल्यावर, दोन तास केली गहन चर्चा

टीम लय भारी

मुंबई :-  दिल्लीनंतर आता मुंबईच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकारण आता वेगाने फुलू लागले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पाटील यांनी अचानक फडणवीसांची भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Chandrakant Patil suddenly went to Fadnavis bungalow and discussion).

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी रविवारी लेटरबॉम्ब टाकला. त्यानंतर राजनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज दिल्लीत राष्ट्रवादीचे पक्ष प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. पाटील यांनी अचानक फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आल आहे. (Chandrakant Patil suddenly went to Fadnavis bungalow and discussion).

Chandrakant Patil suddenly went to Fadnavis bungalow and discussion
पाटील आणि फडणवीस

माजी मंत्री राम शिंदेंना लाभला IAS जावई

नाना पटोलेंचे एक पाऊल मागे; शिवसेनेला गोंजारत भाजपवर साधला निशाणा

चंद्रकांत पाटील आज मुंबईतच होते. आज पहाटे त्यांनी भाजप नेत्यांसोबत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या छोटेखानी कार्यक्रमात भाग घेतला. त्यानंतर पक्ष कार्यालयात त्यांनी राज पुरोहित यांना भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे पत्रे दिले. त्यानंतर त्यांचा पालघरचा दौरा होता.

Video : गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर पुन्हा जहरी टीका, ‘बिनबुडाच्या विचारसरणीचे चाणक्य’ अशी केली संभावना

‘BJP will contest polls alone’: Devendra Fadnavis clears air on patch up possibility with Shiv Sena

Chandrakant Patil suddenly went to Fadnavis bungalow and discussion
पाटील आणि फडणवीस

मात्र, त्यापूर्वीच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानाकडे मोर्चा वळवला. त्यामुळे भाजपच्या या अंतर्गत बैठकीमुळे एकूणच सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. 1 वाजल्यापासून या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली होती. 2 तास ही चर्चा सुरू होती. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या बैठकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही फेर बदल होण्याची शक्यता आहे. अशी चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे.

मात्र, ही भेट कशासाठी होती? अचानक भेट घेण्याचे कारण काय? याचा तपशील गुलदस्त्यात आहे. या चर्चेनंतर चंद्रकांतदादा पाटील पालघरकडे रवाना झाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी