38 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी मंत्री राम शिंदेंना लाभला IAS जावई

माजी मंत्री राम शिंदेंना लाभला IAS जावई

सागर गायकवाड : टीम लय भारी

मुंबई :-  माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या कन्येचा विवाह नुकताच पार पडला. शिंदे यांना IAS जावई लाभला आहे (Ram Shinde daughter married with an IAS officer) त्यामुळे राजकीय वर्तुळात या सोहळ्याची चर्चा रंगली आहे.

राम शिंदे यांच्या कन्येचे नाव डॉ. अक्षता शिंदे आहे. त्या डॉक्टर आहेत. त्यांनी MBBS अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. डॉ. अक्षता शिंदे यांनी आपले शिक्षण पुणे मधील (Dr. D. Y. Patil Institute of Technology)  येथे पूर्ण केले आहे.

नाना पटोलेंचे एक पाऊल मागे; शिवसेनेला गोंजारत भाजपवर साधला निशाणा

Video : गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर पुन्हा जहरी टीका, ‘बिनबुडाच्या विचारसरणीचे चाणक्य’ अशी केली संभावना

तर त्यांचे जावई श्रीकांत खांडेकर हे IAS आहेत. IAS श्रीकांत खांडेकर यांची बिहार येथील नालंदा येथे IAS या पदावर कार्यरत आहेत. खांडेकर सन 2020 बॅचचे IAS अधिकारी आहेत. (Shrikant Khandekar is a 2020 batch IAS officer)

Ram Shinde daughter married with an IAS officer
राम शिंदे यांच्या लेकीच्या लग्नातील फोटो

IAS श्रीकांत खांडेकर कोण आहेत?

IAS श्रीकांत खांडेकर हे मध्यमवर्गीय घरातील आहेत. श्रीकांत खांडेकर यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बी. टेकचे शिक्षण घेतले आहे. श्रीकांत खांडेकर यांनी IAS  होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी त्यांनी दिवसरात्र एक करुन यूपीएससीची (UPSC) परीक्षा दिली होती. यात त्यांना यश मिळाले.

IAS श्रीकांत खांडेकर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील बावची गावात राहतात. IAS श्रीकांत खांडेकर यांनी 2019 च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. या परीक्षेत IAS श्रीकांत खांडेकर देशात 231 व्या क्रमांकावर आले होते. (IAS Srikant Khandekar was ranked 231st in the country)

रोहित पवार – देवेंद्र फडणवीस आले आमने सामने

Amid Sena-BJP Buzz, A “Congress Chief Minister” Comment: 10 Points

Ram Shinde daughter married with an IAS officer
राम शिंदेंची लेक आणि जावई

IAS श्रीकांत खांडेकर यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी तीन एकर जमीन विकली. प्रसंगी व्याजाने पैसे काढून त्यांच्या शिक्षणावर खर्च केले. वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत. अखेर श्रीकांत खांडेकर यांनी IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले (Shrikant Khandekar fulfilled his dream of becoming an IAS).

IAS श्रीकांत खांडेकर यांचे शिक्षण

IAS श्रीकांत खांडेकर यांनी सुरुवातीचे शिक्षण गावातल्याच जिल्हा परिषद शाळेत घेतले. नंतर निंबोणी इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर सोलापुरमध्ये बारीवपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दापोलीच्या कृषी विद्यापीठातून त्यांनी कृषी अभियात्रिकीचे शिक्षण घेतले. याच काळात त्यांची आयआयटीतही (IIT) निवड झाली. पण त्यांनी तिकडे न जाता. यूपीएससी (UPSC) परीक्षा देण्याच्या त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले.

 

Ram Shinde daughter married with an IAS officer
शिंदेच्या लेकीच्या लग्नातील क्षण

IAS श्रीकांत खांडेकर यांनी पुण्यात एक वर्ष अभ्यास केला. नंतर सहा महिने दिल्लीत अभ्यास केला. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी देशात 33 वा क्रमांक मिळवला. IAS श्रीकांत खांडेकर ओबीसी प्रवर्गात राज्यातून त्यांचा दुसरा क्रमांक आला होता. (IAS Shrikant Khandekar came second in the OBC category from the state)

कस जुळलं IAS श्रीकांत खांडेकर आणि डॉ. अक्षता शिंदे यांच नात

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत IAS श्रीकांत खांडेकर देशात 231 व्या क्रमांकावर आले होते. आपल्या गावातील मुलगा IAS  झाला. याने संपूर्ण गाव आनंदी झाले होते. IAS  श्रीकांत खांडेकर यांच्या या घवघवीत यशाबद्दल सत्कार करण्यासाठी ग्रामस्थांनी तयारी सुरु केली. IAS श्रीकांत खांडेकर यांचा सत्कार माजी मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी राम शिंदे यांनी आपली मुलगी डॉ. अक्षतासाठी योग्य वर म्हणून IAS श्रीकांत खांडेकरांना निवडले (Ram Shinde daughter married with an IAS officer).

Ram Shinde daughter married with an IAS officer
राम शिंदेंच्या लेकीच्या लग्न

माजी मंत्री राम शिंदे यांनी IAS श्रीकांत खांडेकर यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर हे नातं जुळून आलं. 14 फेब्रुवारी 2021 ला डॉ. अक्षता शिंदे आणि IAS श्रीकांत खांडेकर यांचा साखरपुडा (valentine day) च्या दिवशी झाला. आज दोघांचा विवाह सोहळा पार पडला. या नव्या नात्यामुळे खांडेकर आणि शिंदे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी