33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयभाजपला दणका : बिहारमध्ये CAA- NRC लागू होणार नाही : नितीश कुमार

भाजपला दणका : बिहारमध्ये CAA- NRC लागू होणार नाही : नितीश कुमार

लयभारी न्यूज नेटवर्क

पाटणा : नागरिकत्व संशोधन कायद्यावरून देशभरात उद्रेक पसरला आहे. आज बिहारमध्ये विधानसभेबाहेर राष्ट्रीय जनता दल (राजद) च्या आमदारांनी नागरिकत्व संशोधन कायदा (CAA ) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) विरोधात जोरदार आंदोलन केले. बिहारमध्ये CAA-NRC लागू होणार नाही, अशी मागणी राजद आमदारांनी केली. त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही दोन्ही कायदे लागू करणार नाही. अशी भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रीय जनता दल हा भाजपाप्रणित एनडीमधील मित्रपक्ष आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का आहे.

भाजपला दणका : बिहारमध्ये CAA- NRC लागू होणार नाही : नितीश कुमार
जाहिरात

दोन्ही कायद्याला नऊ राज्यांमध्ये या कायद्यांना विरोध करण्यात आला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सोमवारी ( १३ जानेवारी ) विधानसभेत स्पष्टपणे सांगितले की, बिहारमध्ये हे दोन्ही कायदे लागू करण्यात येणार नाहीत. राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते आणि आमदार भाई वीरेंद्र यादव यांच्यासह अन्य आमदारांनी विधानसभेबाहेर जोरदार आंदोलन केले. या सर्व आमदारांच्या हातात एनआरसी आणि सीएए विरोधातील पोस्टर होते. भाजप संविधानाला संपवित आहेत. त्यामुळे आम्ही बिहारमध्ये सीएए-एनआरसीला लागू होऊ देणार नाही, असे आंदोलनकर्त्या आमदारांनी ठणकावले आहे. आमदारांच्या आंदोलनानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत यावर स्पष्टीकरण दिले आहे. नितीश कुमार म्हणाले, बिहारमध्ये एनआरसी लागू करण्याचा प्रश्नच येत नाही. हे केवळ आसाम संदर्भातील मुद्दा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे हे बिहारमध्ये लागू होणार नाही, असे नितीश कुमार म्हणाले.

बिहार विधानसभेने डिसेंबर २०१९ मध्ये संसदेत मंजूर करण्यात आलेल्या १२६ व्या संविधान संशोधन (अनुसूचित जनजाती आरक्षण विस्तारासाठी) ला स्वीकार करण्याचा मंजुरी दिली आहे. दरम्यान, जेडीयूचे उपाध्यक्ष असलेल्या प्रशांत किशोर यांनी रविवारी यासंबंधी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, बिहारमध्ये नागरिकत्व आणि एनआरसी हे केंद्र सरकारचे दोन्ही कायदे लागू होणार नाहीत. त्यांच्या या ट्विटनंतर आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावर आपली भूमिकी स्पष्ट केली आहे.

हे सुद्धा वाचा

अनिल देशमुखांच्या दिमतीला आर. आर. आबांचा शिलेदार

अखेर परवेझ मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा रद्द

चारचाकी असूनही अनेकजण आपटले; उध्दव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी