35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईअनिल देशमुखांच्या दिमतीला आर. आर. आबांचा शिलेदार

अनिल देशमुखांच्या दिमतीला आर. आर. आबांचा शिलेदार

टीम लय भारी

मुंबई : गृहमंत्री या पदाला कै. आर. आर. पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात मोठी उंची मिळवून दिली होती. त्यांचे कार्यालय सतत सामान्य लोकांच्या उपस्थितीने गजबजलेले असायचे. आर. आर. आबांचे अधिकारी व कर्मचारीही सामान्य व्यक्तीच्या समस्या ऐकून घ्यायचे. आर. आर. आबांच्या लोकाभिमूख प्रतिमेला साजेसे त्यांचे शिलेदारही काम करायचे. यातीलच एका शिलेदाराला नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या दिमतीला घेतले आहे. संजीव पालांडे असे या शिलेदाराचे नाव आहे.

संजीव पालांडे यांनी आर. आर. आबांचे खासगी सचिव म्हणून काम पाहिले होते. जवळपास चार वर्षे ते आबांकडे कार्यरत होते. नंतर काँग्रेस – राष्ट्रवादीची सत्ता गेली. कालांतराने आबांचेही निधन झाले. मधल्या काळात पालांडे अल्पशा कालावधीकरीता विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे खासगी सचिव म्हणून कार्यरत होते. पण त्यानंतर तीन – चार वर्षे ते मंत्रालयात कार्यरत नव्हते. अशातच आता अचानक अनिल देशमुख यांच्या कार्यालयात खासगी सचिव म्हणून पालांडे यांचा फलक झळकला. पालांडे यांचे नाव पाहताच मंत्रालयात आर. आर. आबांची आठवण जागी झाली.

अनिल देशमुखांच्या दिमतीला आर. आर. आबांचा शिलेदार
जाहिरात

मंत्र्यांकडे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी या पदांवर संधी मिळावी म्हणून अनेक अधिकारी प्रयत्नशिल होते. पण अनिल देशमुखांनी चक्क आर. आर. आबांकडे काम केलेल्या अधिकाऱ्यांची निवड केली. त्यामुळे अनिल देशमुखांचे कौतुक केले जात आहे.

आर. आर. आबांनी गृह खात्याचा चेहरामोहरा बदलताना पोलिसांना आत्मसन्मान मिळवून दिला होता. डान्स बार बंदीसारखा निर्णय त्यांनी कठोरपणा अंमलात आणला होता. पोलीस खाते लोकाभिमूख करण्यातही आबांनी यश मिळविले होते. आबांचा हाच आदर्श अनिल देशमुख यांनी नजरेसमोर ठेवला असेल. आर. आर. आबांप्रमाणेच गृह खात्याची प्रतिमा उंचावण्याची देशमुख यांची इच्छा असेल. त्यामुळेच पालांडे यांच्या रूपाने देशमुख यांनी आबांच्या कार्यालयातील अधिकाऱ्याला आपल्या सोबतीला घेतले असावे असे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपला दणका : बिहारमध्ये CAA- NRC लागू होणार नाही : नितीश कुमार

अखेर परवेझ मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा रद्द

चारचाकी असूनही अनेकजण आपटले; उध्दव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी