31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeराजकीयपुण्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा घेतला हाती

पुण्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा घेतला हाती

लय भारी न्यूज नेटवर्क

पुणे : सर्वच पक्षांमध्ये आयाराम गयारामांचा खेळ सुरु आहे. मतदानाला अवघे 11 दिवस उरले आहेत. तरी सुद्धा पक्षांतर सुरुच आहे. पुण्यात काँग्रेसच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

पुण्याचे माजी महापौर मुकारी अलगुडे, माजी नगरसेवक आनंद छाजेड, माजी स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब रानवडे, पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सदानंद शेट्टी यांनी कमळ हाती घेतले आहे. यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला.

पुण्यात अगोदरच काँग्रेस गर्भगळीत झाली आहे. अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकगठ्ठा पदाधिकारी भाजपवासीय झाले. त्यामुळे काँग्रेस अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी