30 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमुंबईपोलीस अधिकाऱ्याचा रशियन महिलेवर बलात्कार

पोलीस अधिकाऱ्याचा रशियन महिलेवर बलात्कार

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : दहा वर्षांपूर्वी पवई पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याविरूध्द बलात्काराचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता चेंबूर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार रशियन नागरिक असलेल्या महिलेने केली आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

एका रशियन नागरिक असलेल्या महिलेने तिच्यावर एका पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी अनिल जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी पोलीस अधिकाऱ्याने मागील 12 वर्ष अत्याचार करत वारंवार गर्भपात केल्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे.
व्हिसा वाढवून देण्याच्या निमित्ताने 2003 मध्ये आरोपी पोलीस अधिकारी अनिल जाधवशी ओळख झाल्याचं पीडितेने म्हटलं आहे. आरोपीने ओळख झाल्यानंतर गुंगीचं औषध देऊन वारंवार बलात्कार केला. माझ्या मुलाला आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला, असाही आरोप पीडित महिलेने केला आहे.

बहिण भावाचा खून केल्याचा आरोप

आरोपी पोलीस अधिकारी जाधवने एका तरुणीचा आणि तिच्या भावाचा खून आपल्या समक्ष केला. त्यानंतर त्याने त्या बहिण भावाचे मृतदेह पुण्यात एका ठिकाणी गाडले आहेत, असा खळबळजनक खुलासा पीडितेने केला आहे. आरोपी पोलीस अधिकारी अनिल जाधव यांची पत्नी एका पक्षाची पदाधिकारी आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी