31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयनागपुरात मोदी सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन

नागपुरात मोदी सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन

टीम लय भारी

नागपूर :- गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात  पुन्हा एकदा वाढ सुरू झाली आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आजपासून आंदोलन सुरू आहे. मोदी सरकार हे जुलमी सरकार आहे. त्याच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने आंदोलन सुरू आहे (Congress agitation against Modi government’s fuel price hike in Nagpur).

इंधन दरवाढी विरोधात राज्यभरात काँग्रेसच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे. नागपूर मध्ये काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलना दरम्यान सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी शेकडो कार्यकर्ते सायकल घेऊन या सायकल रॅली मध्ये सहभागी झाले होते. पाऊस असताना देखील असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. पेट्रोलचे भाव हे 100 पार झाले असताना आता डिझेल ही 100 रुपये प्रति लिटर वर पोहचत आहे. या दरवाढीला आळा केंद्र सरकार का बसवत नाही असा प्रश्न निर्माण करत हे आंदोलन करण्यात आले (The agitation was organized to raise the question of why the central government is not curbing the rise in prices).

भाजपचे नेते हरीशचंद्राची औलाद आहेत का? बच्चू कडू भडकले

नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला

Petrol, diesel costlier today, even as international oil rates slump

संजय राऊतांच्या नारायण राणेंना शिवसेनेच्या भाषेत शुभेच्छा

जुलैमध्ये सलग पाचव्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ

दरम्यान जुलै महिन्यात सलग पाचव्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. तर तिसऱ्यांदा डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. यापूर्वी जून महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तब्बल 16 दिवस वाढवण्यात आल्या होत्या. तर मे महिन्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 16 दिवस वाढवण्यात आल्या. किरकोळ इंधन दरामधील ही दरवाढ 4 मे 2021 पासून सुरू झाली आहे. यापूर्वी 5 राज्यांमधील निवडणुकांच्या दरम्यान सलग 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी