33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयजयंत पाटीलांची भाजपावर टीका; भाजप ईडीचा गैरवापर करत आहे

जयंत पाटीलांची भाजपावर टीका; भाजप ईडीचा गैरवापर करत आहे

टीम लय भारी

मुंबई :- पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी याच्या अटकेनंतर खडसेंना ईडीने समन्स बजावले होत. आता खडसे आणि त्यांच्या कन्येची ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपने एकनाथ खडसेंच्या विरोधात हे कुभांड रचले आहे. भाजप ईडीचा गैरवापर करत आहे अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपावर केली आहे (NCP state president Jayant Patil has criticized BJP for misusing ED).

जयंत पाटील यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ खडसे यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय ईडीचा गैरवापर करत चुकीच्या पध्दतीने खडसेंना अडकवत आहेत. खडसे यांच्याविरोधात हे कुभांड रचले जात आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी भाजपावर केली आहे (Jayant Patil has attacked BJP).

ईडीचा फास एकनाथ खडसेंभोवती : जावई अटकेत

भाजपचे नेते हरीशचंद्राची औलाद आहेत का? बच्चू कडू भडकले

एकनाथ खडसे यांच्यावर ज्या विषयावर कारवाई सुरू आहे त्यात अद्याप तथ्य आढळलेले नाही. किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. एक जागा त्यांनी रितसर घेतली त्याबाबत निर्णय झालेला आहे. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही. पण त्यामध्ये कुभांड रचून या सर्व एजन्सीमार्फत राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पध्दतीने खडसेंना अडकवत आहेत. मात्र, एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचे काही केलेले नाही त्यामुळे चौकशीतून ते बाहेर येतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

नागपुरात मोदी सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन

Breaking News July 8 LIVE: OBC leader Khadse will come out clean from this entire investigation, says Jayant Patil

NCP state president Jayant Patil BJP for misusing ED
जयंत पाटील

आज सकाळी खडसे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. त्यापूर्वी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. भाजपसोडून राष्ट्रवादीत आलो. त्यानंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचे हे षडयंत्र सुरू आहे, असे सांगतानाच जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसून येत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे असे एकनाथ खडसे म्हणाले होते (Eknath Khadse had said that he was ready to face any inquiry).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी