31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयनाना मत मिळवण्यासाठी गिधाड वृत्तीने वागू नका ; चंद्रशेखर बावनकुळे

नाना मत मिळवण्यासाठी गिधाड वृत्तीने वागू नका ; चंद्रशेखर बावनकुळे

अकोल्याचे खासदार संजय धोत्रे प्रकृतीच्या कारणास्तव व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले < nana patole > यांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे, घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नये आणि मते मिळविण्यासाठी गिधाडांच्या वृत्तीने वागू नका, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे < Chandrashekhar Bawankule > यांनी केली.
श्री बावनकुळे यांनी एक्स समाज माध्यमावर नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभो. त्यासाठी आम्ही सर्वजण रोज प्रार्थना करीत असतो. पण त्यांच्याबद्दल अभद्र बोलून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांच्या, अकोला मतरसंघातील मतदारांच्या मनाला वेदना पोहोचविल्या आहेत. तुम्हाला ही जनता माफ करणार नाही.( Do not behave in a vulture attitude to get different opinions ; Chandrashekhar Bawankule )

पुढे ते म्हणाले, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तुम्ही भाजपविरोधात हवा तेवढा खोटा प्रचार करा, लोकांची मते मिळविण्यासाठी कुणासमोरही पायघड्या घाला. पण तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नका. कुणाच्या मरणाची वाट बघत त्यावर पोट भरणं ही गिधाडांची वृत्ती असते. आणि केवळ मते मिळविण्यासाठी तुम्ही गिधाडांच्या वृत्तीने वागू नका.

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याने कार्यकर्त्यांची घुसमट:

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याने सामान्य कार्यकर्त्यांची घुसमट होत असल्याने हे कार्यकर्ते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत, असे मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशीष शेलार यांनी शुक्रवारी सांगितले.

चेंबूर व गोवंडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटातील उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, कार्यालय प्रमुख अशा 200 हून अधिक जणांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या वेळी आ. शेलार पत्रकारांशी बोलत होते.भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर,जगदीश पराडकर, महादेव शिगवण, नीरज उभारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यालय प्रमुख राजेंद्र भोईर, उपशाखा प्रमुख आनंद नलावडे, संतोष मिटकर, संजय वैती, प्रफुल्ल ठाकूर, रमेश उगले, गटप्रमुख राजेंद्र पवार, संजीव वर्तक,विठ्ठल जाधव, उपशाखा प्रमुख जगदीश पंडित, अर्चना गावंड,अंजली पाटील आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला.भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर,जगदीश पराडकर, महादेव शिगवण, नीरज उभारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यालय प्रमुख राजेंद्र भोईर, उपशाखा प्रमुख गटप्रमुख राजेंद्र पवार, संजीव वर्तक,विठ्ठल जाधव, उपशाखा प्रमुख जगदीश पंडित, अर्चना गावंड,अंजली पाटील आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी