28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक आर टी ओ ला तब्बल ४५४ कोटी महसूल

नाशिक आर टी ओ ला तब्बल ४५४ कोटी महसूल

नाशिक जिल्ह्यातील नाशिक व मालेगाव ही दोन प्रादेशिक परिवहन कार्यालये (RTO) मिळून २०२३ – २०२४ या आर्थिक वर्षात १ लाख ३३ हजार २३२ नवीन वाहनांची नोंद झाली आहे. तसेच वाहन नोंदणी, तडजोड शुल्क व दंड आकारणी यामधून ४५४ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे. यात नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा वाटा ८० टक्के आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन वाहन नोंदणी, वाहन चालवण्याचे परवाने आदीसह वायुवेग पथकांमार्फत करण्यात येणारी कारवाई आणि तडजोड शूल्क आदी करांपोटी महसूल जमा होतो. या माध्यमातून नाशिक परिवहन कार्यालयास २०२२- २०२३ या आर्थिक वर्षात ३१८ कोटी ८७ लाख ४३ हजार २९९ रुपयांचा महसूल मिळाला होता.
( Nashik RTO earns Rs 454 crore )

तर २०२३ – २०२४ मध्ये ३६७ कोटी ७३ हजार ४२२ कोटींचा महसूल मिळाला आहे. तसेच मालेगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाला २०२२-२३ या आर्थिक वर्षातील ८०.४४ कोटी रुपयांच्या तुलनेत २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८३.३० कोटी रुपये महसूल प्राप्त झालेला आहे.दोन्ही प्रादेशिक कार्यालयांमध्ये महसुलात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे वाहन नोंदणीच्या संख्येतही वाढ झाली असल्याचे दिसत आहे. नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात २०२२- २०२३ या वर्षात ८६ हजार ९७८ वाहनांची नोंद झाली होती. त्या तुलनेत २०२३-२४ या वर्षात १ लाख १ हजार ६१९ वाहनांची नोंदणी झाली आहे.

मालेगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयात २०२२-२३ या आर्थिक वर्षात ३१५६० वाहनांची नोंदणी झाली होती. त्यात २०२३-२४ या वर्षात किरकोळ वाढ झाल असल्याच दिसत आहे. मालेगाव कार्यालयात २०२३-२४ या वर्षात ३१६१३ म्हणजे केवळ ५३ वाहनांची अधिक नोंदणी झाली आहे. ७२९०६ दुचाकींची विक्री जिल्ह्यात ट्रॅक्टर, डंपर, माहवाहू वाहने, दुचाकी, प्रवासी वाहने, चारचाकी वाहने, रिक्षा, मालवाहू रिक्षा, क्रेन, पोकलँड, रुग्णवाहिका, बस, मोपेड, ट्रेलर आदी प्रकारच्या वाहनांची विक्री झालेली असून त्यात सर्वाधिक संख्या दुचाकींची आहे. जिल्ह्यात ट्रॅक्टर, डंपर, माहवाहू वाहने, दुचाकी, प्रवासी वाहने, चारचाकी वाहने, रिक्षा, मालवाहू रिक्षा, क्रेन, पोकलँड, रुग्णवाहिका, बस, मोपेड, ट्रेलर आदी प्रकारच्या वाहनांची विक्री झालेली असून त्यात सर्वाधिक संख्या दुचाकींची आहे.

नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात मागील वर्षभरात ७२९०६ दुचाकींची विक्री झाली असून त्या नंतर १८९०१ चारचाकी वाहनांची विक्री झाली आहे. दुचाकींच्या विक्रीत २० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यातुलनेत चारचाकी वाहनांच्या विक्रीत सहा टक्क्यांची वाढ झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी