राजकीय

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी शंभूराज देसाईंच्या मतदारसंघासाठी मंजूर केले 4 कोटी

एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी झालेले प्रमुख नेते शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघासाठी चार कोटी रूपये मंजूर आहेत. बंड केल्याची किंमत देसाई यांनी आता वसूल करायला सुरूवात केली आहे. शिंदे यांनीही देसाई यांच्या बंडाची जाण ठेवली आहे. त्या अनुषंगाने शिंदे यांनी मुख्यमंत्री या नात्याने शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघातील सात गावांसाठी 4 कोटी रूपयांची तरतूद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. अतिवृष्टीमुळे या गावांमध्ये भूस्खलन झाले होते. त्यामुळे गावांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी त्यांचे कायमचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. या गावांसाठी खासगी जमीन खरेदी करण्यासाठी निधी तरतूद करण्यात आली आहे.

या सात गावांच्या पुनर्वसनाची मागणी घेऊन शंभूराज देसाई यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत आमदार शंभूराज देसाई,अपर मुख्य सचिव (महसूल) नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधानसचिव असिम कुमार गुप्ता, वित्त विभागाच्या सचिव श्रीमती ए. शैला, साताराचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनिल गाडे यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

Azadi Ka Amrit Mahotsav : ‘हर घर तिरंगा’ मुंबईत राबणार, 25 लाख ध्वजांचे होणार वितरण

VIDEO : चिमुरड्याने केली पत्रकारिता, शाळेची दुरावस्था आणली चव्हाट्यावर !

VIDEO : शिवसेनेच्या फुटीला नारायण राणे जबाबदार?

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे,अंबेघर वरचे,ढोकावळे,मिरगाव,हुंबरळी,शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती) या सात गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शंभूराजे देसाई यांच्या मतदार संघातील हा पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनावर घेतले असून यासाठी 4 कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्याचे निर्देशच त्यांनी आज जारी केले आहेत. मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षात पाटण विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित गावांच्या पुनर्वसनाबाबत आयोजित बैठकीत त्यांनी या प्रस्तावास मान्यता दिली आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या आंबेघर खालचे अंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुबळी, शिदुकवाडी, जितकरवाडी (निती) या 7 गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने खाजगी जमीन खरेदी करण्याकरीता तातडीने कार्यवाही करण्यात यावी. या गावामध्ये 550 घरे नव्याने उभारण्याच्या कामाला गती देण्यात यावी जेणेकरून या गावांचा कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व समन्वयन यंत्रणांनी गतीने काम करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले आहेत.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

मनपा करसंकलन विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ

मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…

3 hours ago

विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…

3 hours ago

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

6 hours ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

7 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

8 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

8 hours ago